मुंबई : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटची आता चौकशी होणार आहे. केंद्र सरकारच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याचं गुप्तहेर विभाग याची चौकशी करणार आहे.


पॉप गायिका रिहानासह इतरांना उत्तर देताना अनेक सेलिब्रिटींनी विरुद्ध ट्वीट केलं होतं. यामध्ये सुनील शेट्टीने मुंबई भाजप नेते हितेश जैन यांना टॅग केलं होतं. तर अक्षय कुमार आणि सायना नेहवाल ह्यांच्या ट्वीटमधील शब्द आणि शब्द समान होता. यावरून हे सेलिब्रिटी भाजप सरकारच्या दबावात येऊन ट्वीट करत आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता.


ग्लोबल सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सिनेकलाकार, क्रिकेटर यांनी देखील ट्वीट केले होते. पॉप स्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्वीट केले होतं.


सचिन तेंडुलकरने ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही." बाह्य शक्ती प्रेक्षक असू शकतात. मात्र, ते सहभागी असू शकत नाही. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया.




Rihanna Farmer Protest Comment: परराष्ट्र मंत्रालयाकडून रिहाना, ग्रेटा यांना सल्ला, तर अक्षय कुमार म्हणतो..


भारताविरूद्ध प्रचाराचा भाग होऊ नका : अजय देवगन
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांनी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली विरोध करणार्‍यांना इशारा देत आपण कोणत्याही प्रचाराचा भाग घेऊ नये, असा सल्ला दिला आहे. त्यांनी ट्विट केले आहे, की "भारत किंवा भारतीय धोरणांविरूद्ध कोणत्याही प्रचाराचा भाग होऊ नका. कोणताही मतभेद न करता एकत्र उभे राहणे महत्वाचे आहे. "


Farmer Protest | शरद पवारांचा सचिनला मोलाचा सल्ला, 'आपलं क्षेत्र सोडून बोलताना...'


अर्थवट सत्य धोकादायक : सुनील शेट्टी
अभिनेता सुनील शेट्टी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की- "आपण प्रत्येक गोष्टीकडे व्यापक नजरेने पाहिले पाहिजे. कारण, अर्धसत्य धोकादायक असते. तर करण जोहरने लिहिले आहे की आपण कठीण काळात जगत आहोत आणि प्रत्येक वळणावर धीर धरला पाहिजे ही काळाची गरज आहे. एकत्र येऊन प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. शेतकरी हा भारताचा कणा असून यात कुणालाही फूट पाडू देऊ नका.


Mia Khalifa on Farmer Protest: मिया खलिफाचा शेतकऱ्यांना पाठिंबा, म्हणाली...