1. मुंबईतल्या मीरा रोडमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या मागे सिलिंडरचे स्फोट, खुल्या मैदानात एकामागून एक जवळपास 12 स्फोट, अग्निशमन दलाच्या जवानासह दोघं जखमी


2. देवभूमी उत्तराखंडमध्ये जलप्रलय, हिमकडा कोसळून धरणाचा बांध फुटला, दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू, 170 जण बेपत्ता; मदत आणि बचावकार्य सुरु


3. आम्ही तुमच्या सारखं वागलो असतो शिवसेना संपली असती अमित शाहांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात तर पाठीत खंजीर खुपसण्याची सवय नाही, राऊतांचा पलटवार


4. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपुरात गुन्हेगारी वाढली, अजित पवारांचा घणाघात, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना महामंडळ दिल्याचा आरोप


5. लहान मुलांवरही कोरोना लसीची चाचणी केली जाणार, जगातला सर्वात पहिला प्रयोग भारतात होणार, नागपुरातल्या रुग्णालयात तयारी सुरु



6. दशलक्ष लोकसंख्येत अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या, मृत्यूदर अन् सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात कमी


7. स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा संभ्रम


8. नौसैनिकाची हत्या आर्थिक वादातून? प्राथमिक तपासात पोलिसांना संशय, तपासासाठी पालघर पोलिसांची 10 पथके रवाना


9. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आज राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देण्याची शक्यता, कृषी कायद्यांवर काय बोलणार याकडं नजरा


10. ट्विटरच्या भारत-दक्षिण आशिया पब्लिक पॉलिसी हेड महिमा कौल यांचा राजीनामा, वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा दिल्याची ट्विटरची माहिती