हिंगोली : विभक्त पत्नीचा सूड उगवण्याच्या द्वेषातून पतीने हीन पातळी गाठली. माहेरी राहणाऱ्या पत्नीच्या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करुन त्यावर पतीने अश्लील चित्र आणि मेसेज टाकल्याची घटना हिंगोलीत उघडकीस आली आहे.
हिंगोलीतील डोणवाडा भागात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीचा विवाह 31 मार्च 2016 रोजी कळमनुरी तालुक्यातील भाटेगावातील गणेश मुंगावकर याच्याशी झाला होता. सासरची मंडळी पैशासाठी त्रास देतात आणि पती नांदवत नाही, म्हणून ती माहेरी राहत होती.
सात महिन्यांपूर्वी गणेशने पत्नीच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट उघडलं. त्यावर त्याने अश्लील चित्र आणि घाणेरडे मेसेज टाकून पत्नीची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
तक्रारदार महिला परभणीत शिक्षण घेत असलेल्या नर्सिंग कॉलेजमध्ये जाऊनही त्याने बदनामी केली. गणेशने पत्नीच्या आईच्या मोबाईलवरही अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे.
या प्रकाराला वैतागून आरोपी पतीविरोधात पत्नीने पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. या प्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा पोलिस ठाण्यात सायबर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पत्नीचा सूड उगवण्यासाठी पतीकडून अश्लील फोटो फेसबुकवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Nov 2017 05:20 PM (IST)
गणेशने पत्नीच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट उघडलं. त्यावर त्याने अश्लील चित्र आणि घाणेरडे मेसेज टाकून पत्नीची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -