दिवाळीत पगार न मिळाल्याने अंगणवाडी सेविकेची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2017 04:23 PM (IST)
सुमित्रा भगवानराव राखुंडे असं मृत महिलेचे नाव असून तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
परभणी : परभणीत अंगणवाडी सेविकेने आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दिवाळीत सरकारकडून पगार न मिळाल्यामुळे महिलेने टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोर्डी मध्ये ही घटना घडली. सुमित्रा भगवानराव राखुंडे असं मृत महिलेचे नाव असून तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. 2008 ते 2017 या कालावधीतील रजिस्टर पीआरसीला दाखवा, असं ऑफिसकडून सांगण्यात आलं होतं. याचा त्रास सहन न झाल्यामुळे महिलेने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून महिलेता मृतदेह बोरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.