Sharad Pawar Speech In Shirdi: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी रुग्णालयातून थेट शिर्डी गाठत पक्षाच्या शिबिराला हजेरी लावली. यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी केंद्र सरकार, भाजपवर हल्लाबोल केला. संकुचित विचाराच्या सत्ताधाऱ्यांमुळे राज्य अधोगतीला जाऊ शकतो असा हल्लाबोल पवार यांनी केला. शरद पवार यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातील अहमदनगर जिल्ह्याचे स्वातंत्र्य, सहकार चळवळीतील योगदानावर भाष्य करत बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
शरद पवार यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
> पंजाब समस्या हाताळताना घेतलेल्या निर्णयाने इंदिरा गांधी यांची हत्या झाली.
> राजीव गांधी रूपाने देशाला तरुण नेता मिळाला. पण त्यांची, तामिळ प्रश्नांच्या मुद्यावर हत्या झाली. नरसिंह राव काळात राजकीय स्थिरता आली तेव्हा मला संरक्षण खाते जबाबदारी होती
> याच सुमारास अयोध्या मुद्यावर देशाची एकता धोक्यात घालण्याचे काम झाले. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशातील सांप्रदायिक वातावरण गढूळ झाले. भाजपची वाढ याच विचाराच्या आधारे झाली.
> भाजपकडे 1998 मध्ये सत्ता आली. वाजपेयी यांच्या रुपाने सुसंस्कृत नेतृत्व देशाला मिळाले. त्यांनी भारतीय राज्यघटनेची चौकट ओलांडली नाही.
> त्यांच्यानंतर पंतप्रधानपदी आलेले डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला आणखी स्थिरता देत, आर्थिक घडी बसवली.
> कृषी खात्याची जबाबदारी होती. याच काळात कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था, शेतकरी या सगळ्यांमुळे देशात अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली, देश स्वयंपूर्ण झाला. आघाडीचा निर्यातदार देश झाला.
> या दरम्यान भाजपची पाच ते सात राज्यात सत्ता होती.
> 2014 मध्ये मोदींच्या नेतृत्वात भाजपने केंद्रात सत्ता हस्तगत केली. भाजपच्या काळात देशात सध्या काय सुरू आहे याची कल्पना तुम्हा सगळ्यांना आहे.
> संसदीय लोकशाहीत केंद्र आणि राज्यात वेगळे सत्ता असू शकते. केंद्रातील सत्तेत राज्याचे मान राखला पाहिजे.
> केरळ, तामिळनाडू, पंजाब, बिहार, झारखंड, छत्तीसगडमध्ये बंगाल इथे भाजची सत्ता नाही. पण, कर्नाटक, मध्य प्रदेश गोवा,महाराष्ट्रात भाजपची सत्ता नव्हती पण केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमदार फोडून सत्ता मिळवली.
> सामान्य माणसाला ईडी, सीबीआय, एनसीबी, एनआयए आदी संस्था माहिती नव्हत्या. या तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू झाला.
> अनेक राज्यांच्या नेतृत्वावर हल्ला केला जातो सत्ता बळकावणे हा अजेंडा असल्याचे दिसत आहे.
> प्रधानमंत्री शपथ घेताना समान वागणूक देण्याची शपथ घेतली जाते. या पदावरील व्यक्तीकडे विकासाच्यादृष्टीने व्यापक दृष्टीकोन असला पाहिजे, पण सध्याच्या नेतृत्त्वात दिसत नाही.
> पंतप्रधानांनी समाजातील सर्वच घटकांशी सामंजस्य राखून प्रगतीच्या मार्गावर नेणे आवश्यक आहे.
> पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीकडे विकासाचा व्यापक दृष्टीकोन हवा. दुर्देवाने तसे दिसत नाही. एका राज्यातील प्रकल्प दुसऱ्यात जात आहेत. राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे.
> सध्याचे राज्यकर्ते संकुचित विचारांचे असल्याचे दिसून येत आहे.
> प्रकल्प राज्य बाहेर गेले ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
> महाराष्ट्र देशाला दिशा देतात. संकुचित विचाराचे राज्यकर्ते आल्यावर राज्य अधोगतीला जाऊ शकतो.
> राज्यात ओला दुष्काळ आहे. शेतकरी हाल होत आहे. या प्रश्नाकडे राज्यकर्ते लक्ष देत नाही.