Maharashtra Weather Update News : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. पावसासाठी सर्वत्र पोषक वातावरण (Weather) तयार झालं आहे. दरम्यान, सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागात जोरदार पावसानं (Rain) हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं (IMD) वर्तवली आहे. आत्तापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला? पाहुयात याबाबतची माहिती. 


कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या विविध जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. विशेषत: पुण्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. यामुळं पुण्यातील जनजीव पहिल्याच मोठ्या पावसात विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. 


पुणे - 117.1 मिमी


रत्नागिरी - 107.4


सातारा - 61


धाराशीव - 57.4


बारामती - 51.2


नांदेड - 20.8 


सांगली - 19.3


ठाणे -19.4


उदगीर - 47


सोलापूर - 11.6


कोल्हापूर - 16.9


माथेरान - 32.4


अहमदनगर -19.8


मुंबई - 19.8


 


राज्यात आज कुठं पडणार पाऊस?


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. आज कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तसेच सिंदुधुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीव नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.  


महत्वाच्या बातम्या:


राज्यात पावसाचा धुमाकूळ, सकाळपासून मुसळधार, सिंधुदुर्गाला रेड अलर्ट, विदर्भाला यलो अलर्ट