Vidarbha Rain : विदर्भात मुसळधार पावसानं थैमान (Vidarbha Heavy Rain) घातलं आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणचे रस्ते बंद झाल्याचं पाहाला मिळत आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


गडचिरोली जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक मार्ग बंद झाले आहेत. चामोर्शी  तालुक्यातील चांदेश्वर ते येणापूर या मार्गावरील एका पुलावरून अचानक पाण्याच्या पातळीवर वाढ झाल्याने शेतात कामासाठी गेलेले लोक अडकले होते. मात्र, परत घराकडे येण्यासाठी पुलावरील  पाण्याच्या प्रवातून आपल्या बैलांना घेऊन जीवघेणा प्रवास त्यांना करावं लागेल आहे. अनेक वर्षांपासून या मार्गावरील पुलाची मागणी गावकरी करत आहेत पुलाची  अवस्था दयनीय झाली आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात अशाप्रकारे या भागातील नागरिक पाण्यातून जीवघेणा प्रवास करावं लागतोय. 


गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस


गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि कुरखेडा या भागात प्रचंड पाऊस झाला आहे. भामरागडमध्ये 103 मि.मी, तर कुरखेडा येथे सुमारे 116 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. गडचिरोली जिल्हाधिकार्‍यांशी मी सातत्याने संपर्कात असून, नियंत्रण कक्षातून संपूर्ण परिस्थितीवर काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुठलीही आपातकालिन स्थिती उदभवल्यास एसडीआरएफच्या 3 चमू सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. भामरागडमध्ये बाजारपेठेपर्यंत पाणी शिरले असून, तेथून नागरिकांच्या स्थलांतरणाची कार्यवाही प्रारंभ करण्यात आली आहे. पर्लकोटा नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे. सिरोंचाकडे जाणार्‍या रस्त्यांसह सुमारे 27 रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित झाली आहे. गोसिखुर्द धरण आणि चिचडोड बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. जेथे पुलावरुन पाणी वाहते आहे, तेथे सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 


गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ


मुसळधार पावसामुळं गोसीखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व 33 दरवाजे उघडण्यात आलेत. 33 गेट पैकी 23 गेट एक मीटरनं तर, 10 गेट अर्ध्या मीटरनं आता सुरू करण्यात आली आहे. आता धरणाच्या या संपूर्ण 33 गेटमधून 2 लाख 13 हजार 791 पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. काल धरण प्रशासनानं 33 गेट पैकी 13 गेट एक मीटरनं तर, 20 गेट अर्धा मीटरनं सुरू करून त्यातून 1 लाख 77 हजार 353 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. त्यानंतर त्यामध्ये 36 हजार 438 इतका क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.


चंद्रपूरमध्येही मुसळधार पाऊस


चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. चिमूर तालुक्यात दोन जण नाल्यातील पाण्यात दुचाकी वाहून गेल्याने पुराच्या पाण्यात अडकले होते.   शिरपूर-बोधली येथे नाल्याचं पाणी रस्त्यावरून जात असताना देखील दोघजण जात होते. पावामुळं ईरई धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. इरई धरणाचे 7 दरवाजे 1 मीटरने खुले करण्यात आले आहेत.  


महत्वाच्या बातम्या:


आज राज्यात कसं असेल हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा अंदाज