Rain News : आज सकाळपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. अनेक भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे. कोयना महाबळेश्वर (Mahabaleshwar) परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. कोयना धरण (Koyna Dam) परिसरात 100 मिलिमिटर पाऊस तर महाबळेश्वर परिसरात 95 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. सातारा, कराड, वाई, कोरेगाव परिसरात थांबून थांबून पावसाच्या सरी येत आहेत. पावसाचा जोर वाढल्यामुळं कोयना धरणात 50.76 टीएमसी पाणीसाठा आहे. कोयना धरणात प्रतिसेकंदाला 43 हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरु आहे. 


दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात हळूहळू पावसाचा जोर वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये आज सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुण्यासह कोल्हापूर जिल्ह्याला पावाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


आज राज्यभर पावसाचा जोर वाढणार


रत्नागिरी आणि  विदर्भातील गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. या दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं या दोन जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील नऊ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईसह पालघर उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.


सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस


दरम्यान, सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. विशेषत मुंबईसह कोकण विभाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसानं हाहाकार केला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.


महत्वाच्या बातम्या:


विदर्भात मुसळधार पाऊस, 24 तासात सिरोंचा भागात 183 मिमी पावसाची नोंद, आजही मुसळधार पावसाचा इशारा