Heat Wave Guideline: मे महिना सुरू होण्यापूर्वीच राज्यात उन्हाचा तडाखा भयंकर वाढला आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही उष्णतेची लाट (Heat Wave) धडकली आहे. मुंबई-ठाण्यासह राज्यभरात जणू सूर्य आग ओकत असल्याचे चटके नागरिकांना बसत आहेत. गेले काही दिवस मुंबईच्या तापमानाने रविवारी पुन्हा उच्चांकी पातळी गाठली आहे. पुढील काहा दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
'हे' करा (Dos For Heat wave)
- जेव्हा शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या, तुम्हाला तहान लागली नसली तरीही थोड्या वेळाने पाणी प्या
- प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
- ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन (ORS) वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचे रस यांसारखे घरगुती पेय प्यावे.
- टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाव्यात.
- पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.
- तुमचे डोके झाकून ठेवाः थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपीचा वापर करा
- उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालाव्यात.
- हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालवा.
- दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवावे. थंड हवा येण्यासाठी त्यांना रात्री खिडक्या उघड्या कराव्यात.
- जर तुम्ही घराबाहेर जात असाल, तर तुमची घराबाहेरील कामे दिवसाच्या सकाळ आणि संध्याकाळ वेळेपर्यंत मर्यादित करावी.
- दिवसाच्या थंड वेळांमध्ये बाहेरील कामांचे नियोजन करावे.
- लहान अर्भक आणि लहान मुले, घराबाहेर काम करणारे लोक, गर्भवती महिला, ज्यांना मानसिक आजारपण असेलेल व्यक्ती
विशेषतः हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब त्यांच्याकडे अतिरिक्त लक्ष द्यावे. - थंड हवामानापासून ते उष्ण हवामानापर्यंतच्या प्रवाशांनी त्यांच्या शरीराला उष्णतेला अनुकूल होण्यासाठी एक आठवडा वेळ द्यावा, जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे.
- एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या
- तुमचे घर थंड ठेवा; पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा.
- दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करावा.
- शरीर थंड करण्यासाठी पंखा, स्प्रे बाटल्या, ओलसर कापड आणि बर्फाचे टॉवेल वापरावा.
- पाण्यात पाय बुडवल्याने शरीराची उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळतो.
'हे' करू नका (Don'ts for Heat wave)
- उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर पडणे टाळा
- दुपारच्या वेळी बाहेर असताना कठोर परिश्रम टाळा.
- अनवाणी बाहेर जाऊ नका.
- अति उष्णवेळेत स्वयंपाक करणे टाळा.
- हवा येणासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
- अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स किंवा मोठ्या प्रमाणात साखर असलेले पेय टाळा.
- उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
- उभ्या केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका. वाहनातील तापमान धोकादायक ठरू शकते.
हे ही वाचा :