जालना : कोरोना विषाणूचा (Corona Virus) नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे (Omicron Varient) जगभरात खळबळ उडाली आहे. ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याआधीच त्याचा संसर्ग थांबवावा यासाठी सर्व प्रशासनं सज्ज झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही या नव्या संकटासह त्यांच्या विरुद्धच्या लढ्याबाबत महत्त्वाची माहिती विषाणूबा एबीपी माझाशी बोलताना दिली. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती त्यांनी दिली असून सध्या सुरु असलेल्या सर्व गोष्टी आहेत तशा सुरु असणार असंही त्यांनी म्हटलं आहे.


मागील काही दिवसांपासून कोरोनाचा धोका कमी होत असल्याचं चित्र होतं. त्यामुळे राज्य सरकारनेही बऱ्यापैकी गोष्टी सुरु करत अनलॉक राबवण्यास सुरुवात केली होती. त्यात राज्य सरकारने एक डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरियंट आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन होणार का? निर्बंध वाढणार का? असे प्रश्न सर्वांना पडले आहेत. दरम्यान याबाबत बोलताना टोपे यांनी सध्या सुरु असलेल्या कोणत्याही गोष्टी बंद करणार नसून शाळाही सर्व काळजी घेऊन 1 डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचं म्हटलं आहे. सध्या ओमिक्रॉन विषाणूचा एकही रुग्ण न आढळल्याने उगाच भितीपोटी कोणती बंधनं घालणार नसल्याचं टोपे म्हणाले.


लसीकरणावर भर देणार


टोपे यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी योग्य ती काळजी घेणार असल्याचं सांगितलं. तसंच लसीकरणाचा मंदावलेला वेगही पुन्हा पूर्वरत आणणार असल्याचं सांगितलं. आतापर्यंत 40 ते 42 टक्के नागरिकांच संपूर्ण लसीकरण झालं असून लवकरात लवकर किमान एक डोसेजचं 100 टक्के लसीकरण करणं सरकारचं ध्येय असल्याचं टोपे म्हणाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha