Maharashtra Solapur, Latur News: राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपचाराची घोषणा केली. मात्र लातूर (Latur) आणि सोलापूरातील (Solapur) हजारो रुग्णांना या योजनेचा प्रत्यक्षात फायदा होणार नाही. त्यामागील मुख्य कारण असं आहे की, सोलापूर आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयं ही वैद्यकीय महाविद्यालयांकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. त्यामुळे या रुग्णालयाचे कामकाज आता वैद्यकीय शिक्षण विभागाकडील प्रशासनाकडे आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी 15 ऑगस्टपासून मोफत उपचार करण्याची घोषणा केली असली तरी, ही केवळ आरोग्य विभागाच्या अख्त्यारीत येणाऱ्या रुग्णालयानांच लागू करण्यात आली आहे.


सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आणि हेच डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय रुग्णालय आहे. 1977 लासोलापुरात डॉ. वैशंपायंस्मृतीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात झाली. तेव्हापासून सोलापूरचे हे जिल्हा रुग्णालय या महाविद्यालयाला हस्तांतरित करण्यात आलं आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणारे रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित झालं आहे. अशीच परिस्थिती लातूर येथे देखील आहे. इथे देखील वैद्यकीय महाविद्यालय सुरु झालं आणि जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतर झालं. त्यामुळे 15 ऑगस्ट 2023 पासून आरोग्य विभागाने मोफत उपचार सुरु केल्यानंतर सोलापूर आणि लातूरमध्ये ही योजना लागू झालीच नाही. त्यामुळे दररोज हजारो गरीब रुग्णांना मोफत उपचारापासून वंचित रहावं लागत आहे. ज्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत, अशा सर्व जिल्ह्यात जवळपास हाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. 




शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सलग्न रुग्णालयातील दर


केस पेपर : 20 रुपये
रक्त/लघवी तपासणी : 50 ते 100 रुपये
एक्सरे : 100 रुपये
सोनोग्राफी : 100 रुपये
इसीजी : 100 रुपये
सिटी स्कॅन - 350 रुपये
Mri : 2250 रुपये
Icu बेड : 200 रुपये प्रति दिवस
जनरल बेड : 50 रुपये प्रति दिवस 
जेवण : 20 


हे दर अत्यल्प जरी असले तरी एका चाचणीचे किंवा एकाच दिवसाचे आहेत. उपचारासाठी जितक्या जास्त चाचण्या कराव्या लागतात, तितकेच पैसे गोरगरीब रुग्णांना द्यावे लागतात. अनेक रुग्णांकडे साधा केस पेपर काढायचे देखील पैसे नसतात, हीच गोष्ट ओळखून आरोग्य विभागाने मोफत उपचार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हीच योजना सोलापूर लातूर सारख्या जिल्ह्यातही लागू करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे. 


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री म्हणून सत्तेवर आल्यापासून राज्यातील आरोग्यवस्थेत अनेक बदल करताना दिसत आहेत. ठिकठिकाणी आरोग्य शिबीर सुरु आहेत. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देखील सुरु करण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत उपचारही मिळतयात. तीच योजना सोलापूर आणि लातूर सारख्या जिल्ह्यात ही लागू करण्यात यावी अशी मागणी जोर धरतेय. 


आरोग्यमंत्र्यांची राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपचारची घोषणा वैद्यकीय महाविद्यालयांना लागू नाही


राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपचाराची घोषणा केली. मात्र लातूर आणि सोलापूरातील हजारो रुग्णांना या योजनेचा प्रत्यक्षात फायदा होणार नाही. त्यामागील मुख्य कारण म्हणजे, सोलापूर आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयंही वैद्यकीय महाविद्यालयांकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाकडे येथील प्रशासनाकडे कारभार आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे असणाऱ्या सर्व ठिकाणी वैद्यकीय उपचार 15 ऑगस्टपासून मोफत करण्याची राज्य सरकारची योजना होती. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय असणाऱ्या ठिकाणी ती सुविधा उपलब्ध होत नाही. वैद्यकीय महाविद्यालयाकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मात्र केस पेपरपासून सर्व प्रकारच्या चाचण्यांसाठी पैसे द्यावे लागतील. जसे यापूर्वी ते देत होते.


वैद्यकीय महाविद्यालय हे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येतात. त्यांच्यासाठी अजून कोणताही आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही. यामुळेच विविध औषध उपचारासाठी लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे नाममात्र शुल्क आकारणी अद्यापही सुरूच आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील ही मिश्र उपचार केले जावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.