Hasan Mushrif on Hasan Mushrif : ससून रुग्णालयातील डॉक्टरांवरून माझ्यावर आमदार रवींद्र धंगेकर यांनी जे आरोप केलेले हेत ते फक्त प्रसिद्धीसाठी असल्याची टीका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. जर धंगेकरांनी माझी माफी मागितली नाही, तर बदनामीचा दावा मी त्यांच्यावर करेन, असा इशाराही मुश्रीफ यांनी धंगेकर यांना दिला आहे. 


माझा फोन आणि त्या दोन डॉक्टरांचे फोन धंगेकरांनी पोलिसांच्या ताब्यात द्यावेत


मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने ससूनमधील 2 डॉक्टर काम करत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केला. बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार करण्यात आल्यानंतर ससूनमधील दोन डाॅक्टरांना अटक करण्यात आली आहे. यानंतर धंगेकरांनी मुश्रीफांवर तोफ डागली होती. हसन मुश्रीफ म्हणाले की, माझा फोन आणि त्या दोन डॉक्टरांचे फोन धंगेकर यांनी पोलिसांच्या ताब्यात द्यावेत आणि तपास करायला सांगावा. अशी खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागेल, असे माझे भाकीत असल्याची टोलाही त्यांनी लगावला.  






नाहीतर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल


ते म्हणाले की, सनसनाटी आरोप धंगेकर करत आहेत, त्यामुळे त्यांनी माफी मागावी. नाहीतर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जाईल. मी परदेशात असल्याने कोणी शिफारस केली मला माहीत नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, रक्ताच्या नमुन्यात फेरफार करणाऱ्यांना अटक करण्यात आली असून डॉ. तावरे यांच्या सागंण्यावरून सॅम्पल बदलण्यात आलं. चौकशीमध्ये पोलीस खात्याने जो तपास केला आहे त्याची माहिती घेऊन प्रसंगी बडतर्फ करु. मुश्रीफ यांनी सांगितले की, वैद्यकीय शिक्षण विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर ससूनमध्ये ही तिसरी घटना घडली आहे. ललित पाटील ड्र्ग्ज प्रकरणात ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आलं. एक जणाला निलंबित करण्यात आलं आहे. उंदीर प्रकरणातही चौकशी समिती नेमली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या