MHADA Exam : डिसेंबरमध्ये नियोजित म्हाडा सरळ भरती परीक्षेमध्ये (MHADA Exam) गोंधळ घालणाऱ्या जीएस सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला अखेर गृहनिर्माण विभागाने काळ्या यादीत (black list) टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेतला आहे. 

म्हाडा प्राधिकरणाच्या गट अ ते गट ड संवर्गातील सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पार पाडण्याकरिता बाह्य एजन्सीची निवड करण्यात आली होती. यामध्ये जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला म्हाडा परीक्षा घेण्याचे काम देण्यात आले होते.

 

सामंजस्य करार मोडीत काढण्याचा निर्णय

ही परीक्षा 12 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत घेण्यात येणार होती. 11 डिसेंबर रोजी म्हाडाच्या परीक्षेबाबत जी ए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉक्टर प्रितेश देशमुखला गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला होता. म्हाडा भरती परीक्षेचे 12 डिसेंबर रोजी होणारे म्हाडाचे पेपर आधीच फुटल्याचे लक्षात येताच पुढील परीक्षा रद्द करण्यात आली होती. सोबतच परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता ठेवण्यासाठी 12 डिसेंबर रोजी होणारी व त्यापुढील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणात जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून म्हाडा पदभरतीची महत्त्वाचे कामे पूर्णत्वास न गेल्याने त्यांच्या सोबत असलेला सामंजस्य करार मोडीत काढण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला. 

 

म्हाडाच्या प्रतिमेस तडा 

म्हाडा पद भरतीच्या कार्यवाहीत सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे म्हाडाच्या प्रतिमेस तडा गेल्याने जनसामान्यात व उमेदवारांच्या भरतीबाबत संभ्रम, रोष निर्माण झाल्याने या कंपनीस कायमस्वरूपी काळ्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडा परीक्षा त्यानंतर टीसीएस कंपनीच्या मदतीने जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात आली होती. त्याचे योग्यप्रकारे नियोजन सुद्धा टीसीएस कंपनीच्या सहाय्याने करण्यात आले.

 


संबंधित बातम्या :