NDA Interview : एनडीएची (NDA) मुलाखत की 12 वी चा पेपर?  12 वीची परीक्षा सुरू असतानाच एनडीएची (NDA) मुलाखत कशी देणार? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये पेच प्रसंग निर्माण झाला होता. मात्र आता या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे दिसते. विद्यार्थ्यांच्या या अडचणींबाबत  'एबीपी माझा' ने सर्वप्रथम बातमी दाखवली. यानंतर आता बोर्डाकडून या बातमीची दखल घेण्यात आली आहे.


बोर्डाकडून तीन पर्याय


भारतीय सेना (Army), वायुसेना (Air Force) किंवा नौसेनेत (Navy) भरती होण्याची इच्छा असेल तर तुम्हाला NDA म्हणजे नॅशनल डिफेंस अकॅडमी (National Defence Academy) ची परीक्षा देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हे पेपर पास करणाऱ्या उमेदवारांची नंतर मुलाखत घेतली जाते. पण अशातच 12वीची परीक्षाही त्याच वेळी ठेवण्यात आल्याने आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर परीक्षार्थींसमोर पेच प्रसंग निर्माण झाला होता. त्यामुळे एनडीए ची मुलाखत की 12 वी चा पेपर ? असा प्रश्न परीक्षार्थींसमोर उभा राहिला. मात्र एनडीएची (NDA) मुलाखत देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत  'एबीपी माझा' ने सर्वप्रथम बातमी दाखवली. यानंतर आता बोर्डाकडून या बातमीची दखल घेण्यात आली आहे. एनडीएला बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती पुढे घेण्यात याव्यात या संदर्भात पत्र लिहिणार असून बोर्डाकडून या संदर्भात तीन पर्याय समोर ठेवण्यात आले आहे. स्वतः बोर्ड या एनडीए मुलाखत देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन एनडीएला पत्र लिहून मुलाखत परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशा प्रकारची विनंती करणार असल्याचे समजते. बोर्ड एनडीए मुलाखत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा एनडीएला परीक्षा पुढे ढकलण्यात संदर्भात विनंती करण्याचे पत्र लिहावे, असे आवाहन करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे, 


पेपर विद्यार्थ्यांना देता येणार, पण...


शेवटचा पर्याय म्हणजे एनडीएने कुठल्याही प्रकारे विनंती मान्य न केल्यास विद्यार्थ्यांना जुलै महिन्यात पुन्हा एकदा 12 वीच्या बोर्डाच्या होणाऱ्या पुरवणी परीक्षेदरम्यान उरलेले परीक्षेचे पेपर विद्यार्थ्यांना देता येणार आहेत. यासंदर्भात बोर्डाकडून तातडीने बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.


परीक्षार्थींसमोर पेच प्रसंग
एनडीए ची मुलाखत की 12 वी चा पेपर ? आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर परीक्षार्थींसमोर पेच प्रसंग निर्माण झालाय.  इयत्ता 12 वीचा  5 आणि 7 मार्चचा पेपर एक महिना पुढे ढकलल्याने विद्यार्थी-पालक चिंतेत आहेत. कारण 4 ते 9 एप्रिल दरम्यान एनडीए ची होणार मुलाखत देखील ठेवण्यात आलीय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना NDA मध्ये प्रवेश घ्यायचा असेल. अशा परीक्षार्थींना मात्र आता कुठल्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार असल्याचं समोर येतंय. 



पालक विद्यार्थी चिंतेत


12 वीचा पेपर एक महिना पुढे ढकलण्यात आल्याने आता 5 आणि 7 एप्रिल रोजी हे पेपर होणार आहेत. दरम्य़ान 12 वीच्या परीक्षेची तारीख बदलण्याची पालक, विद्यार्थ्यांनी मागणी केलीय. तर शालेय शिक्षण विभागाने देशसेवेसाठी आतुर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करण्याची मागणी केलीय. दोन्ही परीक्षा एकाच वेळी आल्यानं पालक विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.


महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI