बारामती :  एक तीळ 7 जणांनी खाल्ला होता अशी आपल्याकडे आख्यायिका आहे. त्याचप्रमाणे बारामती तालुक्यातील ढेकळवाडी ग्रामपंचायतीने सरपंच आणि उपसरपंच पद पाच वर्षासाठी 7 जणांनी वाटून घेतलं आहे. ते वाटून घेत असताना त्यांनी गावतीलच बुवासाहेब मंदिरात शपथ घेतली आणि हा शपथ घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


बारामती तालुक्यातील ढेकळवाडी या ग्रामपंचायतीचा शपथ घेतनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आरक्षण पदाची सोडत निघाली आणि सरपंच पद हे ओबीसी महिलांसाठी राखीव झालं. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण सहा महिला निवडून आल्या होत्या. त्यातील चार महिला या ओबीसी प्रवर्गातील आहेत. यातील सीमा ठोंबरे 14 , सीमा झारगड 7, लक्ष्मी बोरकर 21 तर सुनीता टकले या 14 महिन्यांसाठी सरपंच असणार आहेत. तर उपसरपंच पदासाठी राहुल कोळेकर, हर्षद चोपडे आणि शुभम ठोंबरे हे प्रत्येकी 18 महिन्यांसाठी उपसरपंच असणार आहेत.


ढेकळवाडी ग्रामपंचायत ही 11 सदस्यीय ग्रामपंचायत आहे. त्यातील सात जण सरपंच आणि उपसरपंच होणार आहेत. खरं तर हे सरपंच पदाचे वाटप करताना गावातील बुवासाहेब मंदिरात महिला सरपंच पतीचा शपथविधी पार पडला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही शपथ का घेण्यात आली याचा किस्सा देखील मोठा रंजक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली. देशाचा कारभार राज्यघटनेप्रमाणे चालतो. परंतु आज देखील देवाला साक्षी ठेवल्याशिवाय आपलं पान हालत नाही.


संबंधित बातम्या :



Grampanchayat Election 2021 : गावगाडा हाकायचा कुणी? परभणीच्या पालम तालुक्यातील तीन गावांना पडला प्रश्न


"गड आला पण सिंह गेला"... क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेले तासगाव तालुक्यातील ढवळी गावचे अतुल पाटील पॅनेलसहित विजयी