धुळे : ग्रामपंचायत निवडणुकीत धुळे तालुक्यात सुनेने सासूवर मात केली आहे. पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे यांनी सासू सुशीला दत्तात्रय भदाणे यांचा पराभव केला आहे. ज्ञानज्योती भदाणे यांची थेट सरपंचपदी निवड झाली.
महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यातील 3 हजार 131 ग्रामपंचायतीच्या निकालांना जाहीर झाला आहे. पहिल्याच टप्प्यात बीड तालुक्यात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना पुतण्या संदीपने धोबीपछाड दिली. क्षीरसागर यांचं मूळ गाव असलेल्या नवगण राजुरीत संदीप यांचं पॅनल निवडून आलं. यावर्षी तब्बल 40 वर्षांनंतर गावात निवडणूक झाली.
शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांना मोठा धक्का बसला आहे. मालेगावमधील दाभाडी आणि सौंदाणे इथं भाजपचा झेंडा फडकला. जालना तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांचा वरचष्मा कायम दिसतोय. कारण तब्बल 5 ठिकाणी राष्ट्रवादीचे सरपंच निवडून आले.
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर बघायला मिळत आहे. तर भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या जळगावमध्ये भाजप आघाडीवर आहे. बीड जिल्ह्यातील परळीत मुंडे बहिण-भावाच्या लढतीत पंकजा मुंडे यांनी सरशी केली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक : चुरशीच्या लढतीत सुनेची सासूवर मात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Oct 2017 02:59 PM (IST)
पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे यांनी सासू सुशीला दत्तात्रय भदाणे यांचा पराभव केला आहे. ज्ञानज्योती भदाणे यांची थेट सरपंचपदी निवड झाली.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -