मुंबई : राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. परंतु सत्तास्थापन करण्यासाठी आम्ही असमर्थ आहोत, आम्ही सत्तास्थापन करणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला निमंत्रण दिलं आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करणं आवश्यक आहे.


राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी 144 आमदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. तर त्यांच्याकडे 8 अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. असे मिळून शिवसेनेकडे 64 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेनेकडे अधिक 80 आमदारांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीकडे 54 तर काँग्रेसकडे 44 आमदारांचे संख्याबळ आहे. तिन्ही पक्षांकडे मिळून 162 आमदारांचे संख्याबळ आहे.

उद्या संध्याकाळपर्यंत सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे पाठिंबा मागायला जाणे आवश्यक आहेत. या दोन्ही पक्षांचा पाठिंबा मिळाल्यानंतरच शिवसेना सत्तास्थापनेचा दावा करु शकते.

पाहा भाजपची नेमकी भूमिका काय?



मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार! शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं विधान