मुंबई/दिल्ली : राज्याच्या राज्यपालांनी भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे त्यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. या निमंत्रणावर चर्चा करण्यासाठी आज दुपारी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची अजून एक बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सुरु आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव हेदेखील या बैठकीत सहभागी झाले आहेत.
विशेष म्हणजे गेल्या 17 दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर आहेत. परंतु शाह आज राज्याच्या राजकारणात लक्ष घालणार आहेत. वर्षा बंगल्यावर सुरु असलेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत अमित शाह हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीनंतरच भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार का? शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी स्वीकारणार का? की विरोधी बाकावर बसणार? हे ठरणार आहे.
शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याने सत्तास्थापनेचा तिढा अजून आवळला आहे. भाजपकडे शिवसेनेला सोबत घेण्याशिवाय पर्याय नाही. तर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून पाठिंबा मिळतो का? याची चाचपणी करत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, शिवसेना राज्यात सरकार स्थापन करणार असेल तर भाजप विरोधी बाकावर बसेल, अशी भूमिका भाजपने घेतल्याची चर्चा आहे. परंतु शिवसेना भाजपसोबतच सत्तास्थापन करेल, या आशेवर अजूनही भाजपचे काही नेते आहेत.
मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकाला बसवणार! शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं विधान
पाहा काय होणार भाजपच्या बैठकीत? भाजप सत्तास्थापन करणार की नाही?