Governor Bhagat Singh Koshyari : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात उभारल्या जाणाऱ्या बहुउद्देशीय क्रीडा सभागृहाचे भूमिपूजन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या अभियानातून महाराष्ट्रातील विद्यापीठात अशाप्रकारचे क्रिडा सभागृह होत आहे. यांचाच कोनशिला अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी हे विद्यापीठ अजून नवीन असून खूप विकास करायचा असल्याचे सांगितले होते . यावर बोलताना राज्यपाल कोशारी यांनी मंत्र्यांना बोलवा , अधिकाऱ्यांच्या मदतीने कंपन्यांचा सी एस आर फंड मिळवा आणि लोकसहभागातून विद्यापीठाचा विकास घडवा असा सल्ला दिला. विरोधाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मोजक्या निमंत्रितामध्ये हा सोहळा झाला . 


लोकसहभागातूनच विद्यापीठाचा विकास


केंद्र सरकारच्या खेलो इंडिया अभियानातून महाराष्ट्रातील एकमेव सोलापूरच्या विद्यापीठास साडेचार कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. या अनुदानातून बहुउद्देशीय क्रीडा सभागृह उभारले जाणार आहे. त्याचाच भूमिपूजन सोहळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस उपस्थित होत्या. या प्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलताना म्हणाले.  विद्यापीठाचा विकास साधायचा असेल तर सरकारच्या मदतीसह, अधिकारी , मंत्रीगण, लोकप्रतिनिधी तसेच सामान्य नागरिक यांना विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमात सहभागी करून घेणे गरजेचे आहे. लोकसहभागातूनच विद्यापीठाचा विकास साधला जाईल. क्रीडा विकासातून अनेक खेळाडू घडतील. राष्ट्रीय तसेच ऑलिंपिक सारख्या स्पर्धा प्रकारात या परिसरातील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवावे. असे आवाहनही यावेळी राज्यपाल यांनी केली.


इतर महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Budget 2022: सापाच्या पिल्लाला 30 वर्षे दूध पाजलं, आता ते फुत्कारतंय; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका


Maharashtra Budget Session 2022 : राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी! भाषण 22 सेकंदात थांबवून राज्यपाल निघाले


Maharashtra Budget Session LIVE: अभिभाषण पटलावर ठेवत राज्यपाल थांबले, भाषण न करताच राज्यपाल निघाले


Devendra Fadnavis : दाऊदच्या माणसाला वाचवण्यासाठी सरकारवर दबाव आहे का? फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल