एक्स्प्लोर

Mumbai-Pune Railway | मुंबई-पुणे मार्गावर मालगाडी घसरल्याने वाहतुकीचा खोळंबा, अनेक गाड्या रद्द

शुक्रवारी देखील याच मार्गावर मालगाडीचे इंजिन घसरले होते. घटनेनंतर डाऊन मार्गावरील वाहतूक सुरु करायला तब्बल 24 तासांपेक्षा अधिकचा वेळ लागला होता.

पुणे : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा घाटात मालगाडी रुळावरुन घसरल्याने वाहतुकीचा पुन्हा खोळंबा झाला आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे, तर मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मालगाडीचे पाच ते सहा डबे घसरल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कामानिमित्त पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

मुंबई-पुणे मार्गावरील जामरुंग आणि ठाकूरवाडी रेल्वे स्थानकादरम्यान पहाटे 4.30 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. यामुळे डाऊन आणि मिडल लाईनवरील वाहतूक बंद झाली आहे. तर अप लाईन म्हणजे मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरु आहे. मालगाडीचे डबे घसल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

शुक्रवारी देखील याच मार्गावर मालगाडीचे इंजिन घसरले होते. घटनेनंतर डाऊन मार्गावरील वाहतूक सुरु करायला तब्बल 24 तासांपेक्षा अधिकचा वेळ लागला होता. अतिवृष्टीमुळे घडलेल्या या घटनेनंतर रेल्वे प्रशासनावर 29 आणि 30 जूनला येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रगती, सिंहगड या एक्सप्रेस तर पुणे-पनवेल-पुणे ही पॅसेंजर रद्द करण्याची वेळ आली होती. तसेच पुणे-भुसावळ ही दौंडमार्गे वळवण्यात आली होती.

आजच्या घटनेनंतर ही पुण्याच्या दिशेने धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांच्या सोईसाठी अधिकच्या बसेस पुण्याच्या दिशेने पाठवण्याचं रेल्वे प्रशासनाने आवाहन केलं आहे.

मुंबई-पुणे मार्गावरील रद्द एक्स्प्रेस
  • सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
  • सीएसएमटी-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
  • सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
  • सीएसएमटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस (मुंबई-पुणेदरम्यान रद्द)
  • भुसावळ-पुणे एक्स्प्रेस (नाशिक रोड स्टेशन स्थानकात थांबवली)
  • पुणे-भुसावळ एक्स्प्रेस
  • पुणे-पनवेल पॅसेंजर
  • पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन
  • पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस
मार्गात बदल केलेल्या एक्स्प्रेस
  • सीएसएमटी-बंगळुरु उद्यान एक्सप्रेस
  • कल्याण-इगतपुरी-मनमाड एक्स्प्रेस
  • अहमदाबाद-पुणे दुरांत एक्स्प्रेस
  • इंदूर-पुणे एक्स्प्रेस
थांबवलेल्या एक्स्प्रेस
  • हुजूर साहिब - (पनवेल न जाता पुण्यात थांबवली)
  • भुसावळ - पुणे (नाशिक मध्ये थांबली)
  • हमसफर एक्सप्रेस - (पनवेलमध्ये थांबली)

महत्त्वाच्या बातम्या

Police Threats Students : खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली
खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Embed widget