Gondia-Bhandra Election 2024 : नुकतीच पार पडलेली विधानपरिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election Result) चांगलीच चुरशीची झाली. आपले सर्व उमेदवार विजयी व्हावेत यासाठी महायुतीने आपली ताकत पणाला लावली होती. प्रत्यक्ष निवडणुकीतही त्याचा सकारात्मक परिणाम दिला. महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले. यात भाजपचे नेते परिणय फुके (Parinay Fuke) यांचा देखील समावेश आहे. फुके हे विधपरिषदेचे आमदार झाले असले तरी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले (Nana Patole) यांना शिंगावर घेण्यासाठी ते भंडारा- गोंदिया जिल्ह्यात (Bhandara Gondia  Election) सक्रिय राहणार असल्याचे संकेत मिळत आहे.


याला निमित्त ठरले आहे ते नागपूर विभानतळावर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी परिणय फुके यांचे लावलेले होर्डिंग. यात परिणय फुके यांचा उल्लेख भंडारा गोंदिया जिल्ह्याचे जननायक असा केला आहे. त्यामुळे परिणय फुके आमदार झाले असले तरी पुढील काळातील भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची धुरा फुके यांच्या खांद्यावर राहील, असे चिन्ह दिसत आहे. या होर्डिंगची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. 


विधानसभेची धुरा परिणय फुकेंच्या खांद्यावर?


भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात (Bhandara Gondia Lok Sabha Election) काँग्रेसचा नवा चेहरा असलेले डॉ. प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांनी सलग दुसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार असलेले सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांचा पराभव केलाय.  या मतदारसंघातून सुरवातीला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांच्या नावाची चर्चा होती. तर दुसरीकडे त्यांना शह देण्यासाठी भाजप नेते परिणय फुके यांनी कंबर कसली होती. मात्र स्वत: नाना  पटोले यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याने परिणय फुके यांनी देखील आपली माघार घोषित केली. त्यानंतर भाजप पक्ष नेतृत्त्वाने विधानपरिषदेच्या निवडणुकीत परिणय फुके यांना संधी दिली आणि त्यात त्यांचा विजयी झाला.


नागपूर विभानतळावर लागलेल्या होर्डिंगची चर्चा 


असे असले तरी आता साऱ्यांना वेध लागले असलेल्या विधानसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे नेतृत्त्व पुन्हा  परिणय फुके यांच्या कडे येण्याचे संकेत आहे. त्याला कारण ठरले आहे नागपूर विभानतळावर भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी परिणय फुके यांचे लावलेले होर्डिंग. यात परिणय फुके यांचा उल्लेख भंडारा गोंदिया जिल्ह्याचे जननायक असा केला आहे. भाजपच्या उद्योग आघाडीचे अध्यक्ष असलेल्या आकाश अग्रवाल यांचा नेतृत्वात हे होर्डिंग लावण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता आता भंडारा-गोंदीया जिल्ह्याची विधानसभेची धुरा परिणय फुकेंच्या खांद्यावर येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या