Devendra Fadnavis Provides lift to Kishori Pednekar : सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओची चर्चा रंगली आहे. एरव्ही एकमेकांवर टीकास्त्र डागणारे राजकारणी गरजेच्या वेळी एकमेकांच्या मदतीस उतरतात. याचाच प्रत्यय गोवा विधानसभा निवडणुकांच्या (Goa Assembly Election 2022) प्रचारा दरम्यान आला. 


गोवा येथे प्रचारासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आल्या होत्या. अचनाक गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी आली. मुंबईच्या पहिल्या नागरिक असणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांना पणजी येथून मुंबईकडे येण्यासाठी सकाळी फ्लाईट मिळत नव्हतं. तेवढ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यांच्या चार्टर प्लेनंनं मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. महापौरांनी फडणवीसांसी संपर्क साधून गोव्यातून येणाऱ्या चार्टर प्लेनमध्ये लिफ्ट देण्याची विनंती केली. आणि महापौर किशोरी पेडणेकरांची ती विनंती फडणवीसांनी मान्यही केली. 


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, गोवा सीएम प्रमोद सावंत अणि गिरीश महाजन हे चार्टर प्लेननं गोवातून मुंबईला आले. त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकरही मुंबईपर्यंत आल्या. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्यातील वाद सर्वश्रुतच. तसेच महापौर आणि मिसेस फडणवीस यांच्यातील वाक्युद्धही आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. अशातच शिवेसना आणि भाजप यांच्यात उडत असलेले दररोजचे खटके, याबाबत आणखी काही बोलण्याची गरज नाहीच. अशातच नाजूक प्रसंगात महापौर आणि देवेंद्र फडवणीस यांचा राजकीय प्रवास हा चर्चेचा विषय ठरत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha