Buldhana News :  मुख्यमंत्री महोदय येणाऱ्या काळात आपण मंत्रिमंडळ बनवू शकणार का नाही? यात शंका आहे. त्यामळं लवकरात लवकर डॉ. संजय रायमुलकर (Dr Sanjay Raimulkar) यांना तातडीने मंत्री बनवा, असे मत माजी महसूल राज्यमंत्री सुबोध सावजी (Subodh Savaji) यांनी व्यक्त केले. गेल्या दोन वेळेस मेहकर विधानसभेचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचे मंत्रिपद हुकलं आहे. त्यामुळं आता 90 दिवस का होईना त्यांना तात्काळ मंत्रिपदाची शपथ देऊन त्यांना मंत्री बनवा असे सावजी म्हणाले. रायमुलकर हे वैफल्यग्रस्त असल्याचे सावजी म्हणाले. 


प्रकृती बिघडल्यानं डॉ. संजय रायमुलकर रुग्णालयात दाखल


भलेही इतर लोकांना नंतर मंत्री बनवा पण डॉ. संजय रायमुलकर (Dr Sanjay Raimulkar) यांना तात्काळ मंत्री पदाची शपथ द्या असे सुबोध सावजी म्हणाले. तसेच याबाबतचे पत्र देखील सावजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे. एकीकडे मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांची काल अचानक बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या बैठकीत प्रकृती बिघडली आहे.  त्यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशावेळी बुलढाण्यातील एका माजी मंत्र्याने अशी खोचक मागणी केल्याने चर्चेचा विषय बनला आहे.


एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हाही रायमुलकर हे नवीन कोट घालून तयार होते


आमदार संजय रायमुलकर हे पंचायत राज समितीचे अध्यक्षही होते. तसेच त्यांना जातीच्या प्रमाणपत्रासाठी खूप तारेवरची कसरत करावी लागली होती असे सावजी म्हणाले. दरम्यान, ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी देखीलय रायमुलकर यांचे नाव मंत्रीपदाच्या चर्चेत होते. तर ज्यावेळी शिवसेनेत फुट पडली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी देखील रायमुलकर यांचा नवीन मंत्रीमंडळात समावेश होणार अशी चर्चा होती. त्यावेळी रायमुलकर हे नवीन कोट घालून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा घेत बसले होते, असा टोलाही सावजी यांनी लगावला.  


दरम्यान, आषाढी वारीला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापुजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री पंढरपुरात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होईल. काही काळजी करु नका असे वक्तव्य केलं होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होते. मात्र, आचा फक्त तीन महिन्यांसाठी मंत्रीमंडळाचा विस्तार होणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Jayant Patil on Cabinet Expansion: 'मंत्रीपदाचे स्वप्न किमान दोन महिने...', मंत्रीमंडळ विस्तारावर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य