सांगली : MPSC तून उत्तीर्ण झालेल्या 413 विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या अद्याप रखडल्या आहेत. यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केलाय. आदित्य ठाकरे यांना लगेच कॅबिनेटमध्ये स्थान दिले गेले. जसं आदित्य  ठाकरेंबाबत तत्परता दाखवली तीच तत्परता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  ज्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत त्यांच्या बाबतीत का दाखवत नाहीत? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलाय.  


मराठा आणि धनगर समाजाला या सरकारला आरक्षण द्यायचेच नाही. अनेक विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली नाही. ठाकरे सरकारने या विद्यार्थ्यांचे नुकसान केले असे देखील गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. मुख्यमंत्री आपल्या मुलाला कॅबिनेट मंत्री बनवण्यात जशी तत्परता दाखवतात तशीच त्यांनी या 413 जणांच्या नियुक्तींबाबत दाखवावी, अन्यथा सरकारविरोधात आंदोलन केले जाईल असा इशाराही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय.


सर्वोच न्यायालयात गायकवाड आयोगाची ठाकरे सरकारने पाठराखण केली नाही. या सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण द्यायचेच नाही, याच मार्गाने सव्वा वर्षात सरकारकडून काम झाले. मराठा आरक्षण रद्द झाले याला ठाकरे सरकारच जबाबदार  आहे, अशी टीकाही पडळकर यांनी केली. मराठा आरक्षण रद्द झाले वेदनादायी आहे हे राज्य सरकारचे अपयश आहे. यामुळे अन्य प्रवर्गातील 413 जणांच्या नियुक्त्या रखडल्या असून ज्या तत्परतेने आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्री केले. याच तत्परतेने मेगा भरतीतील 413 विद्यार्थ्यांची नियुक्ती कधी देणार? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला आहे. 2020 मध्ये पास झालेल्या 413 विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे आठ दिवसात यांना नियुक्तीपत्र द्या, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. 


संबंधित बातम्या