सातारा : गो कार्टिंगचा थरार अनेकांना एन्जॉय करायचा असतो. मात्र हा थरार अनुभवताना तुम्ही जीव धोक्यात तर टाकत नाही ना? हा प्रश्न विचारण्यासाठी कारणीभूत ठरली आहे साताऱ्याच्या पाचगणीतली एक दुर्घटना. चाकात केस अडकल्यामुळे 12 वर्षांची विद्यार्थिनी जखमी झाली आहे.
गो कार्टिंगचा थरार अनुभवताना योग्य ती खरबदारी न घेतल्यास गो कार्टिंग तुमच्या जीवावर बेतू शकतं. साताऱ्यात गो कार्टिंग दरम्यान घडलेल्या अपघातात 12 वर्षांची कानन भट गंभीर जखमी झाली. गो कार्टिंगसाठी स्टेअरिंग हातात धरण्यापूर्वी आवश्यक ती काळजी न घेतल्यामुळे काननला मोठा फटका बसला.
गो कार्टिंग करताना काय काळजी घ्याल?
गो कार्टिंग करताना हेल्मेट घालायला विसरु नका
हेल्मेट घातल्यानंतरही महिलांनी केस मोकळे सुटणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे
साडी अथवा ओढणीसारख्या मोकळ्या कपड्यांचा पेहराव टाळला पाहिजे
पाचगणीत घडलेल्या घटनेत नेमकं कोण दोषी आहे? हे सांगता येणार नाही. मात्र खेळ कोणताही असो काळजी घ्यायलाच हवी. नाही तर उत्साहाच्या भरात आयुष्याचा खेळखंडोबा होऊ शकतो.
पाचगणीत गो कार्टिंग करताना चाकात केस अडकून विद्यार्थिनी जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jun 2019 01:28 PM (IST)
साताऱ्यात गो कार्टिंग दरम्यान घडलेल्या अपघातात 12 वर्षांची कानन भट गंभीर जखमी झाली. त्यामुळे थरार अनुभवताना घेण्याची काळजी अधोरेखित झाली आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -