बीड : गोवरची लस दिल्याने नऊ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाला, असा खळबजनक आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथील ही घटना आहे. आरती नंदकुमार जाधव असं मृत मुलीचं नाव आहे.

चिमुकल्या आरतीला गोवरची लस देण्यात आली. त्यानंतर दिवसभर तिची प्रकृती दिवसभर चांगली होती. मात्र रात्रीच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. हा मृत्यू गोवरची लस दिल्यानेच झाला, असा आरोप कुटुंबीयांना केला आहे.

दरम्यान, या चिमुकलीचं पार्थिव शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात करण्यात आलं आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची माहिती या शवविच्छेदनाच्या अहवालातून समोर येईलच. मात्र कुटुंबीयांच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.