नवी दिल्ली : यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रापाठोपाठ आसामचा चित्ररथ दुसऱ्या क्रमांकावर तर तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती आहे.
जगाने पाहिली देशाची ताकद, राजपथावर भक्ती, शक्ती आणि संस्कृती

प्रजासत्ताक दिनी राजपथावर विविध राज्यांचे तसेच दूरदर्शन, सैन्यदलासह विविध खात्यांचे चित्ररथ साकारण्यात आले होते. महाराष्ट्राने यावर्षी शिवराज्याभिषेकाचा चित्ररथ साकारला होता. तर आसामने स्थानिक लोककलांवर आधारित चित्ररथ साकारला होता. छत्तीसगडच्या चित्ररथानेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
महाराष्ट्राचा चित्ररथ येताच संभाजीराजेंची उभं राहून घोषणाबाजी

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथांच्या क्रमांकाची अधिकृत घोषणा झालेली नाही. उद्या रविवारी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
स्वतंत्र भारतातील प्रजासत्ताक दिनाची पहिली परेड कुठे झाली माहितीय का?