Girish Mahajan : उपमुख्यमंत्रिपदी कायम राहून पक्षसंघटनेसाठी काम करणार, प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचणार; देवेंद्र फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन

Delhi BJP Meeting Update : राज्यात भाजपला मिळालेल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.

Continues below advertisement

नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आणि त्या ठिकाणी दुसऱ्याची वर्णी लागणार या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. अमित शाहांसोबत झालेल्या भेटीनंतर मोठा निर्णय झाला असून देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची विनंती फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदी कायम राहून देवेंद्र फडणवीस हे आता पक्षसंघटनेसाठी काम करणार आहेत. विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ते जनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघापर्यंत पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Continues below advertisement

लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील भाजपमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तण्यात येत होती. देवेंद्र फडणवीस जर राजीनाम्यावर ठाम राहिले तर गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदावर वर्णी लागू शकते अशीही चर्चा होती. त्यावर गिरीश महाजनांनी स्पष्टीकरण दिलं असून या निव्वळ अफवा असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातून 45 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचं लक्ष असताना महायुतीला मात्र केवळ 17 जागा मिळाल्या. त्यामध्ये भाजपने राज्यात 28 जागा लढवून त्यांना फक्त 9 जागा जिंकता आल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या. भाजप आणि महायुतीच्या या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी ठेवली होती

राज्य सरकारमधून आपल्याला मुक्त करावं अशी विनंती केंद्राकडे करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तसेच विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षासाठी काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांची बैठक

देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामध्ये या दोन नेत्यांनी फडणवीसांनी सरकारमध्येच राहावं यासाठी मनधरणी केल्याची माहिती आहे.

त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली असून चर्चेचा तपशील मात्र मिळाला नाही. 

राज्यातील प्रत्येक मतदारसंघात पोहोचण्याचा फडणवीसांचा प्रयत्न

पुढच्या चार महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. पक्ष संघटनेमध्ये काम करून ती बळकट करण्याचा मानस देवेंद्र फडणवीसांचा आहे. त्यामुळे आपल्याला सरकारमधून मोकळं करा असा आग्रह फडणवीसांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती आहे. मात्र ही मागणी अमित शाहांनी फेटाळली आहे. 

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता जनादेश यात्रा काढण्याचा देवेंद्र फडणवीसांचा निश्चय आहे. त्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचाही प्रयत्न आहे.  

ही बातमी वाचा: 



Continues below advertisement
Sponsored Links by Taboola