नागपूर : कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकार सर्वच स्तरावर इजेक्शनचा योग्य पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. आता वर्ध्यातील 'जेनेटेक लाईफ सायन्सेस'ला 30 हजार वायल (कुपी) प्रतिदिन रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं आहे. नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारकडून ही परवानगी मिळाली आहे.
रेमडेसिवीर तयार करणाऱ्या गिलेड कंपनीने सात कंपन्यांना हे इंजेक्शन तयार करण्याची परवानगी दिली होती. त्यातील एक कंपनी 'लोन लायलंस'द्वारा जेनेटिक लाईफ सायन्स रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करेल. साधारण एका आठवड्यात वर्ध्यात रेमडेसिवीरचे उत्पादन सुरू होईल आणि15 दिवसांत 30 हजार वायल प्रतिदिन इंजेक्शन विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांत उपलब्ध होतील.
यासाठी आवश्यक त्या सगळ्या परवानग्या मिळवण्यासाठी नितीन गडकरी यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानेच केंद्र सरकारने ही परवानगी दिली आहे. पुढील आठवडाभरात रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणे सुरू होईल आणि 15 दिवसात 30 हजार इंजेक्शन प्रतिदिवस बनणार आहेत.