Gayatri Shingne on Rajendra Shingane : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी घरवापसी केली आहे. ते आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. याच मुद्यावरुन पुतणी गायत्री शिंगणे (Gayatri Shingne) यांनी राजेंद्र शिंगणे यांच्यावर जोरदार टीका केलीय. साहेब तुम्हाला माफ करतील, पण तुम्ही ना घरच्यांशी एकनिष्ठ, ना जनतेशी असे म्हणत गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणेंवर जोरदार हल्लाबोल केला.
नेमकं काय म्हणाल्या गायत्री शिंगणे ?
ज्या माणसाला वाटत असेल की तुतारीत जाऊन त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे तर त्यांनी ही गोष्ट डोक्यातून काढून टाकली पाहिजे. आदरणीय साहेब तुम्हाला घेत असतील, माफ करत असतील पण जनता तुम्हाला माफ करणार नाही. जनता तुम्हाला साथ नाही देणार. आजचा हा माझा शब्द कायम लक्षात ठेवा तुम्ही एकनिष्ठां ना पक्षांसाठी होते ना घरच्यांसाठी होते ना जनतेसाठी असे म्हणत गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणे यांच्यावर टीका केली आहे.
राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिल्यास बंड करण्याची गायत्री शिंगणेंची घोषणा
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक नेते वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणे हे घरवापसी करणार आहे. ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात राजेंद्र शिंगणे यांचा प्रवेश पार पडणार आहे. नुकतीच राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिल्यास बंड करण्याची घोषणा केली होती. गायत्री शिंगणे यांनी याबाबत शरद पवार यांची भेट घेऊन राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी देखील केली होती. मात्र, आता शिंगणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळं शिंगणे यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळणार का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय.
महत्वाच्या बातम्या:
तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या अन् शरद पवारांवरही तोफ डागलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अखेर तुतारी फुंकलीच!