रत्नागिरी : कोरोना! तीन शब्दांमुळे सर्वत्र सध्या चर्चा, काहीशी भीती आणि मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली जात आहे. याबाबत आता WHOनंतर केंद्र सरकार आणि आता राज्य सरकारनं देखील खबदारी घ्यायला सुरूवात केली आहे. राज्यात जवळपास 39 रूग्ण कोरोनाचे आढळले आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारनं देखील खबदारीबाबत योग्य ती पावलं उचलताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत यंत्रणेला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या नंतर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकार परिषद घेत त्याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाबाबत पुढील तीस दिवस महत्त्वपूर्ण आहेत. कोरोनाबाबत घाबरून जाण्याची काळजी नसली तरी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. आपण याबाबत सजग आणि जागृक राहत योग्य ती खबरदारी घेतल्यास कोरोनावर सहज मात करू शकतो, असा विश्वास यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शिवाय, उचलण्यात आलेल्या उपाययोजनांच्या खबरदारीच्या पावलांबाबत देखील माहिती दिली.


गणपतीपुळे मंदिर राहणार बंद


सध्या राज्यात सर्वच देवस्थानांनी मंदिरं बंद ठेवण्याचा किंवा खबरदारीचे उपाय केले आहेत. पण, रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिर मात्र अद्याप देखील सुरू होतं. पण, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत मंदिर प्रशासनाला सूचना देत उद्यापासून ( मंगळवार ) गणपतीपुळे मंदिर हे पुढील सूचना अथवा निर्णय होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.


शाळा, महाविद्यालयं राहणार बंद


शासनाच्या जीआरमध्ये ग्रामपंचायत हद्दीतील शाळा किंवा महाविद्यालय बंद ठेवण्याबाबत कुठेही उल्लेख नव्हता. त्याबाबतचा निर्णय हा जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला होता. दरम्यान, आता जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय उद्यापासून ( मंगळवार ) बंद ठेवण्यात येणार आहेत. पण, शिक्षकांना मात्र शाळेत आणि महाविद्यालयामध्ये येणं बंधनकारक असणार आहे.


जिल्ह्यात काय घेतलीय खबरदारी?


कोरोना अद्याप कोकणात, रत्नागिरीत आलेला नाही. पण, त्यानंतर देखील रत्नागिरीतील प्रशासन सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. जिल्ह्यात येणारे सर्व एन्ट्री पॉईंटवर खास लक्ष ठेवलं जाणार आहे. याठिकाणी प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हातील प्रमुख रेल्वे स्थानका, एसटी बस स्थानकावर देखील खबरदारी घेतली जाणार आहे. शिवाय, कोणत्याही ऑफिसरला परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. याबाबत ऑर्डर काढणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तर, गावागावातील वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित यंत्रणा यांना देखील त्याबाबत माहिती देत सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


#CoronaEffect | कोरोनाच्या प्रादुर्भावाने सिद्धिविनायक मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय



संबंधित बातम्या :


Coronavirus | राज्यातील एकूण रुग्ण संख्या 39 वर, मुंबईत एका तीन वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट


संतापजनक...! कोरोनाबाधित कुटुंब राहात असलेली सोसायटी बहिष्कृत; मुंबईतील धक्कादायक घटना


Coronavirus डहाणूतील डाय मेकिंग व्यवसायावर कोरोनाचे संकट, डायची निर्यात ठप्प