पालघर : पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागात असलेल्या तारापूर, चिंचणी, वरोर, वासगाव, वाढवण ,ओसार,डहाणू खाडी,गुंगवाडा, तनाशी या लगत असलेल्या इतर गावांमाध्ये पारंपरिक सोन्या-चांदीचे दागिने बनविण्याचे साचे तयार केले जातात. या साच्यांना परदेशात मोठी मागणी असते. जवळपास 15 ते 20 हजार कारागीर या व्यवसायावर अवलंबून आहेत. येथील साचांना देशाबरोबरच दुबई, बांगलादेश, श्रीलंका , मलेशिया, शिंगापूर आणि इतर देशात मोठ्या प्रमाणात मागणी असून निर्यात होतात.


सध्या कोरोनाच्या संकटामूळे हा व्यवसायच ठप्प झाला असून, मोठं संकट या कारागिरांवर ओढवल आहे. तर हा व्यवसाय करण्यासाठी काही कारागिरांनी बँकेकडून कर्ज घेतली असून आधुनिक मशीन खरेदी केल्यामुळे ही कर्ज फेडायची कशी या विवंचनेत सध्या येथील कारागीर आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या संकटामुळे सर्व कारागीरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे

डहाणूसह परिसरातील 15 ते 20 हजार कारागीर आणी त्यांच्या कुटुंबातील लाखों लोकांचा वडिलोपार्जित उदरनिर्वाहाचा एकमेव पर्याय साचे बनवणे. सोने , चांदी तसेच दागिने बनविण्यासाठी लागणाऱ्या साच्याला  महाराष्ट्रासह संपूर्ण देशात तसच देशाबाहेर ही मोठी मागणी होती. मात्र सध्या जगात सुरू कोरोनो व्हायरसच संकटामुळे सध्या साच्यांची मागणी पूर्णपणे घटली असल्याने येथील कुशल कारागिरांच्या हाताला काम राहिलं नाही. परिणामी येथील हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे .

तर काही कारागिरांनी हा व्यवसाय सोपा व्हावा म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन आधुनिक पद्धतीच्या सीएनसी मशीन खरेदी केल्या. मात्र कामच नसल्याने आता बँकांचे कर्ज फेडणे ही कठीण झाल्याने  मोठं संकट कारागिरांपुढे उभं राहिलं आहे.