मानवतेच्या दृष्टीतून कोरोनाग्रस्त असलेल्या नागरिकांना मदत करणे तसेच त्यांच्या कुटुंबाला धीर देणे गरजेचे आहे. परंतु या उलट मुंबईत मात्र कुटुंबच नाही तर जिथे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत, त्या संपूर्ण सोसायटीवर बहिष्कार घातला आहे.
घाटकोपर येथील इमारतीमधील एक कुटुंब कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले होते. याची माहिती मिळाल्यानंतर पालिका प्रशासन आणि इतर यंत्रणांनी त्या ठिकाणी जाऊन या संपूर्ण इमारतीचं निर्जंतुकीकरण केलं. तसेच येथील कर्मचारी आणि नागरिकांची तपासणी देखील केली होती. मात्र या सोसायटीवर आता आजूबाजूच्या सोसायटींनी बहिष्कार घातला आहे.
CM on #Coronavirus | सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी टाळा, धार्मिक उत्सव बंद करा - मुख्यमंत्री
या सोसायटीत घरकाम करणाऱ्या महिलांना त्या ठिकाणी काम करण्यास गेल्यास इतर ठिकाणी कामासाठी येण्यास मनाई केली आहे. तसेच सेवा देण्यास गेलेल्या लोकांना इतर इमारतींमध्ये प्रवेश नाकारल्याने इथले नागरिक गेले सहा दिवस त्रस्त झाले आहेत. यात बहिष्कार घातलेल्या सोसायटीतील नागारिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. मुंबईतील ही घटना अत्यंत निंदनीय असून यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दरम्यान राज्यात यवतमाळ येथे एक आणि नवी मुंबई येथे एक असे दोन करोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39 झाली आहे. राज्यात 108 लोक विलगीकरण कक्षात दाखल असून 1063 होम क्वारंटाईन असून त्यापैकी 442 जणांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. दरम्यान मुंबईत एका तीन वर्षाच्या मुलीला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई महापालिकेने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. कल्याण येथील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालेल्या व्यक्तीची 33 वर्षीय पत्नी आणि तीन वर्षीय मुलीचे नमुने कोरोना पॉजिटिव्ह आल्याचा तपशील महापालिकेने दिला आहे.
राज्यात अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
पिंपरी चिंचवड मनपा- 9,
पुणे मनपा- 7,
मुंबई -6,
नागपूर-4,
यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण-प्रत्येकी 3,
रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद- प्रत्येकी 1 असे एकूण 39 रुग्ण आढळून आले आहेत.
#Coronavirus पिंपरीतील पळून गेलेला कोरोनाचा रुग्ण फिल्मी स्टाईलने पोलिसांच्या ताब्यात! स्पेशल रिपोर्ट