Ganpat Gaikwad Firing Case : उल्हासनगरमधील (Ulhasnagar) हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये (Hill Line Police Station) घडलेल्या गोळीबार प्रकरणी रंजित यादव याला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. रंजित हा आमदार गणपत गायकवाड यांचा वाहनचालक आहे. त्याला आज उल्हासनगर कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे


 


आज उल्हासनगर कोर्टात केले हजर, 14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी


उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबार प्रकरणी आरोपी गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि नागेश बडेकर हे दोघं अद्यापही बेपत्ता आहेत. मात्र गणपत गायकवाड यांचा वाहनचालक रंजित यादव याला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. रंजित यादवयाला आज उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणी विकी गणात्रा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर अटकेची कारवाई सुरु आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी विविध पथक तैनात करण्यात आली आहेत.


 


पोलिसांकडून मुलाचा शोध सुरू 


हिल लाईन पोलीस स्टेशनमधील गोळीबार घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये गणपत गायकवाड यांच्या मुलाचाही समावेश दिसून आला. त्यामुळे पोलिसांकडून वैभव गायकवाडचा शोध सुरु आहे. दरम्यान, ठाण्यातील कळवा पोलीस स्टेशनच्या जेलमध्ये आमदार गणपत गायकवाड यांना ठेवण्यात आलं आहे. त्यांची कळव्यातील पोलीस स्टेशन मधील जेलमध्येच वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.  


 


विकी गणात्रा खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात


भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिल लाइन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. गणपत गायकवाड यांच्यासह संदीप सरवणकर, हर्षल केणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड, नागेश बडेकर अद्यापही फरार असून व्यावसायिक आणि भाजप पदाधिकारी विकी गणात्रा याला खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. 


 


नेमकं प्रकरण काय? घटना सीसीटिव्हीत कैद


भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिल लाइन पोलीस ठाण्यात गोळीबार केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. हा सर्व थरार पोलिस स्टेशनच्या सीसीटिव्हीत कैद झाला. घडलेला प्रकार असा की, आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड उल्हासनगर येथील 'हिल लाईन' पोलीस ठाण्यात आले. तसंच शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील देखील तिथं आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी वैभव यांनी पुन्हा आमदारांशी फोनवरून संपर्क साधत पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आमदार गणपत गायकवाड गायकवाड देखील 'हिल लाइन' पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यावेळी गणपत गायकवाडसह त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्यात जमा झाले. आमदार गायकवाड पोलीस ठाण्यात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यांच्या केबिनमध्ये गेले. त्या केबिनमध्ये आगोदरच महेश गायकवाडसह त्यांचा साथीदार राहुल पाटील उपस्थित होते.तिघं वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप केबिनमध्ये चर्चा करत असताना पुन्हा गणपत गायकवाड यांची महेश पाटील यांच्यात वाद झाले. अप्पर पोलीस आयुक्त दत्ता शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेव्हा गायकवाड यांनी त्यांच्याजवळील बंदुकीतून महेश गायकवाडसह राहुल पाटील यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. गायकवाड यांच्या बंदुकीतील गोळ्या संपल्यानतंर त्यांच्या खासगी अंगरक्षकानं त्यांच्याजवळील बंदुकीतून गोळीबार सुरू केला. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकानं अंगरक्षकाची बंदूक हिसकावून घेतल्यानं पुढील अनर्थ टळला, असं देखील शिंदे म्हणाले.