Pandharpur Vitthal Temple Solapur : विठ्ठल रुक्मिणीला (Vitthal Rukmini) घालण्यात येणाऱ्या अभिषेकाच्या पाण्यावरुन वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. विठ्ठल रुक्मिणीला अभिषेकासाठी चंद्रभागा सोडून उत्तर प्रदेश मधील गंगेचे पाणी आणल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आक्षेप गणेश अंकुशराव यांनी घेतला आहे. त्यांच्या या आक्षेपामुळं नवीन वादंग निर्माण दोण्याची शक्यता आहे.
विठ्ठल रुक्मिणीला केवळ चंद्रभागेचा अभिषेक करण्याची प्रथा आणि परंपरा
जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेला वारकरी सांप्रदायात अनन्य साधारण महत्त्व आहे. विठ्ठलाच्या चरणाशी वाहणारी चंद्रभागा ही वारकरी संप्रदायाला विठुराया एवढीच प्रिय आहे. असे असताना आता विठ्ठल मंदिरात उत्तर प्रदेश येथून गंगा आणून देवाचा अभिषेक केला जात असल्याचा आक्षेप सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी घेतला आहे. शेकडो वर्षापासून विठ्ठल रुक्मिणीला केवळ चंद्रभागेचा अभिषेक करण्याची प्रथा आणि परंपरा आहे. मात्र विठ्ठल मंदिरात उत्तर प्रदेश येथून आणलेले गंगाजलचे मोठमोठे ड्रम आढळल्यानंतर अंकुशराव यांनी हा आरोप केला आहे. आता मंदिराने याबाबत खुलासा नाही केला तर मात्र नवीन वादंग निर्माण होऊ शकेल. याबाबत मंदिर समिती काय खुलासा करणार याची प्रतीक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या:
पंढरपूरवर पुराची टांगती तलवार! चंद्रभागेत 1 लाखाहून अधिक विसर्गानं पाणी, वाळवंट पाण्याखाली, आपत्ती व्यवस्थापन विभाग कुठे?