Gopichand Padalkar on Jayant Patil :  गेल्या काही दिवसापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Gopichand Padalkar) यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं चित्र पाहायला मिळतच आहे. गोपीचंद पडळकर हे सातत्याने जयंत पाटील यांच्या खालच्या शब्दात टीका करत आहेत. आज पुन्हा पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. मला मंगळसूत्र चोर म्हणतात, जयंत पाटील यांनी सांगावं त्याच्या कितव्या बायकोचे मी मंगळसूत्र चोरले अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.  

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर टीका केलेल्या विरोधकांना शायरीतून उत्तर दिले आहे. बडी सी बडी हस्तीं मीट गई मुझे मींटाने मे! 'तेरी उम्र जायेगी मुझे मिटाने मे असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जयंत पाटील यांच्यावर देखील जहरी टीका पडळकरांनी केली आहे.  मला मंगळसूत्र चोर म्हणतात, जयंत पाटील यांनी सांगावं त्याच्या कितव्या बायकोचे मी मंगळसूत्र चोरले. मंगळसूत्र चोरीच्या आरोपावरून गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्यावर  टीका केली आहे. 

गेल्या काही दिवसापूर्वीही पडळकरांनी जयंत पाटलांवर केली होती जहरी टीका

गेल्या काही दिवसापूर्वी देखील पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. मला एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात अडवकण्यासाठी जयंत पाटलांनी प्रयत्न केलायाने महाराष्ट्र कसा चालवला, जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा आपण किती बिनडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय. फंडाबाबत आमदार पत्र देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त आमदाराचा आणि कंत्राटदाराचा काही संबंध येत नाही. जयंत पाटलाचे काम फक्त गोपीचंद पडळकरला बदनाम करण्याचं आहे. पण मी काय आता आलोय का? असे अनेक अंगावर घेऊन आलोय. या प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये दोन-दोन महिने मी जेलमध्ये जाऊन आलोय. जतमध्ये जयंत पाटलांनी माणसे पाठवली. गोपीचंद पडळकरांनी कोणत्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का याची माहिती घेतली. जर मी कुणाकडून पैसे घेतले असतील तर खंडणीचा गुन्हा दाखल करता येतो का पाहिलं. पण हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे अशी टीका पडळकरांनी केली होती. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Jayant Patil : गोपीचंद पडळकरांच्या टीकेनंतर शरद पवार गटाकडून संताप, मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार, जयंत पाटलांनी मात्र थेट हातच जोडले, म्हणाले...