सोलापूर : हिंगणघाट जळीतकांड प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोलापुरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक अत्याचाराची घटना घडलीय. मुलगी अल्पवयीन असून गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी रिक्षाचालकासह 10 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. यातील बहुतांश आरोपी रिक्षाचालक आहेत.

एका अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा महिन्यात आळीपाळीने 10 नराधमांनी अत्याचार केला. जुलै महिन्यापासून हा सगळा प्रकार सुरू होता, वेगवेगळ्या ठिकाणी या नराधमांनी तिच्यावर अत्याचार केले. मंगळवारी(11 फेब्रुवारी)दुपारी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिराजवळ पीडित मुलगी रडत बसली होती. एका स्थानिक नागरिकाने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मुलीला पोलीस स्थानकात आणून तिला विश्वासात घेत चौकशी केली असता तिने या बद्दल माहिती दिली. काही दिवसांपासून काही तरुण पीडित मुलीला जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार करत असल्याचे समोर आले. पोलीसांना या घटनेची माहिती कळताच तपासाची चक्रे फिरवली.

नाशिकामध्ये अल्पवयीन गतीमंद मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणातील 10 पैकी 5 आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. इतर आरोपींच्या शोधत पोलीस पथक रवाना झाले आहेत. पीडित मुलगी ही सोलापुरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. तर आरोपींपैकी बहुतांश जण हे रिक्षाचालक आहेत. या प्रकरणात भादंवि कलम 376(ड), पॉस्को आणि अट्रोसिटी कायद्याच्या अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे हे करत आहेत.


Nagpur Rape | नागपुरात पर्यवेक्षकाचा महिला कामगारावर बलात्कार, आरोपी जेरबंद | ABP MAJHA