Ganesh Chaturthi 2021 LIVE Updates: आज गणरायाचं आगमन, गणेशोत्सवाचं लाईव्ह अपडेट्स

Ganpati Sthapana : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना होत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Sep 2021 01:46 PM
खासदार नवनीत राणा यांच्या घरी बाप्पाचं आगमन

 अमरावती शहरात आणि जिल्ह्यात गणपतीसाठी इको फ्रेंडली डेकोरेशन तयार करण्यावर भर दिला गेला आहे.. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीतही मोठा उत्साह या गणपती बाप्पाच्या आगमनावेळी पाहायला मिळत आहे.. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी आमदार रवी राणा आणि त्यांचं अख्खं कुटुंब सहभागी झाले होते...

आरोग्यमंत्र्यांच्या घरी बाप्पाचे आगमन

 राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घरी सुद्धा आज लाडक्या बाप्पाचे आगमन झाले, दरवर्षी प्रमाणे आज सहकुटुंब टोपे कुटुंबाने बाप्पाची प्रतिष्ठापना केली, यावेळी त्यांचे दोन्ही पुत्र देखील सोबत होते,दरम्यान टोपे यांनी विधिवत पूजा करत कोरोनाचं विघ्न दूर होऊ दे अशी प्रार्थना देखील त्यांनी यावेळी केली..

राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्यात गणपती बाप्पाची स्थापना

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गणरायाचे स्वागत केले जातंय..नांदेडात राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना परिसरात श्रीची स्थापना करण्यात आलीय..जगासह देश व महाराष्ट्रावर कोरोनाच संकट टळलं नाही,त्यातच पावसाने महाराष्ट्रात थैमान घातलाय या सर्व संकटातून सावरण्याची शक्ती गणपतीबाप्पाने द्यावी अशी प्रार्थना बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बाप्पा चरणी केलीय..

छत्रपती घराण्यातील गणरायाची प्रतिष्ठापना

 कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही आज उत्साहामध्ये गणरायाचं आगमन झालय... घराघरांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून छत्रपती घराण्यातील गणरायाची प्रतिष्ठापनाही आज करण्यात आलेय...कोल्हापूरच्या न्यू पॅलेस मध्ये आज पारंपारिक पद्धतीने छत्रपती घराण्यातील खासदार संभाजी राजे छत्रपती यांचे सुपुत्र शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गणरायाच पूजन करण्यात आलं... यावेळी छत्रपती घराण्यातील सर्व सदस्य उपस्थित होते...तर कोल्हापूर जिल्ह्यात आगमन मिरवणुकांवर बंदी असल्याने अनेक मंडळांनी साध्या पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे...

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरी बाप्पाचे आगमन

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले. मुंबईतील निवासस्थानी शिंदे कुटुंबीयांनी गणरायाची प्रतिष्ठापना केलीय.  काँग्रेस ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली. यावेळी शिंदे कुटुंबीय हजर होते.

गोदावरी एक्सप्रेसच्या बोगीत गणेशाची स्थापना, 25 वर्षांपासूनची परंपरा कायम
 25 वर्षांपासून मनमाड-ते-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मध्ये धावत्या गाडीत बसविला जाणारा गोदावरीचा राजा सलग दुसऱ्या वर्षी  ट्रेन बंद असली तरी यार्डात उभ्या असलेल्या ऐका बोगी मध्ये श्री गणेशाची स्थापना करण्यात आलीय. मनमाड ते कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मध्ये दरवर्षी नाशिक पर्यंत अप-डाऊन करणारे चाकरमान्यांकडून पासधारकांच्या बोगीत दरवर्षी गणेशाची स्थापना करीत असतात,बोगीत एक दिवस अगोदरच आकर्षक सजावट करण्यात येत असते.यात विविध सामाजिक संदेशाचे पोस्टर सुध्दा लावण्यात येत असतात. मात्र सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच सावट आणि अजूनही स्थानिक पातळीवरुन सुटणा-या रेल्वे ट्रेन बंद असल्याने गोदावरी एक्सप्रेस अनेक महिन्यांपासून रेल्वे यार्डातच उभी आहे,मात्र परंपरा खंडीत होऊ नये म्हणून यार्डात उभ्या असलेल्या गाडीच्या बोगीतच सजावट करण्यात येऊन सोशल डिस्टन्सच पा
कोरोनामुळे प्रतिष्ठापनेआधी मिरवणुका निघणार नाहीत

Pune Ganesh Utsav 2021: आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच मानाचे गणपती मंडळानी हा आनंदाचा उत्सव मागील वर्षाप्रमाणे साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.मानाचे पाचही गणपतीची तसेच प्रमुख गणपती प्राणप्रतिष्ठापना आज दुपारपर्यंत होणार आहे.कोरोनामुळे प्रतिष्ठापनेआधी मिरवणुका निघणार नाहीत. सर्व गणपतीचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून भक्तांना घेता  घेता येणार आहे...पाहुयात पाच मानाचे गणपती प्राणप्रतिष्ठापना कशी होणार आहे.

कसबा गणपती मानाचा पहिला गणपती

 


 


श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठा सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी होणार आहे.पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे.त्याआधी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे श्रींची मूर्ती पालखीतून उत्सव मंडपात आणण्यात येईल मंडळाच्या फेसबुक पेजवर दर्शन आणि लाईव्ह कार्यक्रम पाहता येणार आहे...








पार्श्वभूमी

Ganpati Sthapana Vidhi : आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी, म्हणजेच, गणेश चतुर्थी. आज घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. आजपासून म्हणजेच, 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. घराघरांत भक्तीमय वातावर असेल. गणरायाची यथासांग पूजाअर्चा करुन गणरायाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. गणेशोत्सवाचे 10 दिवस अत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडतील. त्यापूर्वी गणेश चतुर्थी दिवशी गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा शुभ मुहूर्त, विधी काय? याविषयी जाणून घेऊया...


 


गणरायाची स्थापना करण्यासाठी भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्यानं त्या दिवशी जमलं नाही तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. तर एखाद्या वर्षी कोणत्याही कारणानं गणरायाची प्रतिष्ठापना करता आली नाही तर, पुढच्या वर्षी गणरायाची प्रतिष्ठापना करु शकता. यंदाच्या वर्षी पहाटेपासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी गरायाची स्थापना आणि पूजा करता येईल. उत्तम मुहूर्त म्हणून गणपतीची घरी पहाटे 4:50 पासून दुपारी 1:50 पर्यंत कधीही प्रतिष्ठापना करू शकतो. 


 


'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' या जयघोषात बाप्पाची मूर्ती घराघरांत आणली जाते. दारात मुर्तीचे पाय धुवून, अक्षता अर्पण करुन औक्षण केलं जातं. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावर मुर्तीची स्थापना केली जाते. गणरायाच्या स्थापनेसाठी सर्वात आधी पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरुन त्यावर मूर्ती ठेवली जाते. मुर्तीवर गंगाजल शिपडून देवाला जानवं घातलं जातं. सर्वात आधी गणरायाला पंचामृताने स्नान घालून केशर, चंदन, अक्षता, दुर्वा, फुले, दक्षिणा अर्पण केली जाते. त्यानंतर घरातील सर्व मंडळी गणरायाची पूजा करतात. आरती करुन बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.  


 


आपल्या श्रद्धेप्रमाणे घराघरांत दीड, पाच, सात आणि दहा दिवस गणरायाची सेवा केली जाते. या दिवसांमध्ये रोज बाप्पाची पूजा करुन त्याला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. शेवटच्या दिवशी जागरण करुन खेळ खेळले जातात. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा जयघोषात बाप्पाला ठरलेल्या वेळी निरोप दिला जातो. पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पाच्या आगमनाची प्रतिक्षा केली जाते.




 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.