मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. आपल्या धडाकेबाज फलंदाजीने त्याने जगभरातील क्रिकेट प्रेमींना आपलसं केलं आहे. एकदिवसीय सामना असो, कसोटी सामना असो किंवा टी-20 असो विराटची बॅट तळपते. त्यातूनच, त्याने टीम इंडियाला अनेकदा संकटातून बाहेर काढून विजय मिळवून दिलाय, कोट्यवधि भारतीयांना आपल्या शानदार खेळीने त्याने आनंद दिलाय. त्यामुळेच विराट कोहलीला (Virat Kohli) समोर पाहणे किंवा त्याच्यासमवेत फोटो काढायला मिळणे हेही चाहत्यांसाठी स्वप्नवत ठरते. सध्या सोशल मीडयावर विराटचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे. त्यामध्ये, तृतीयपंथी चाहत्यांकडून विराटसोबत सेल्फी, फोटो घेण्यासाठी चांगलीच धावाधाव करण्यात आल्याचं दिसून येत आहे. विराट कोहली फॅन क्लब या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, तृतीयपंथी चाहत्याने अखेर विराटसोबत सेल्फी आणि एक फोटो घेतलाच. 


मुंबईतील एका ठिकाणी विराट कोहली आल्याचे पाहताच तृतीयपंथी चाहत्यांना अत्यानंद झाला होता. त्यामुळे, विराटसोबत सेल्फी घेण्यासाठी ते पुढे सरसावरले. तसेच, विराटला फोटो देण्यासाठी विनंतीही केली. त्यावर, आतमध्ये गेल्यावर देतो असे विराट म्हणताना दिसून येतो. मात्र, चाहत्यांच्या आग्रहास्तव त्याने बाहेर आपल्या चाहत्याला सेल्फी देण्यासाठी पोज दिली. पण, तत्पूर्वी विराट हॉलच्या दिशेन आतमध्ये जात असताना चाहत्याने विराटचा हात पकडून आग्रहाने व हक्काने त्याच्यासोबत फोटो काढल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. आधी विनंती केली, नंतर फोटोसाठी विराटचा हातच धरल्याचंही दिसून येत आहे. विराट कोहली फॅन क्लब या एक्स अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला असून विराटच्या चाहत्याचा मुंबईतील अतिशय सुंदर क्षण... असं कॅप्शनही या व्हिडिओसह दिलं आहे. दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करुन आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात, काहींनी कौतूक केलंय, तर काहींनी हात धरल्यावरुन मजाही घेतली आहे.   




विराट सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तयारीत


न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात विराट कोहली फोल ठरल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. सध्य तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची तयारी करत असून ऑस्ट्रेलियात 10 नोव्हेंबरपासून या मालिकेची सुरुवात होत आहे. ही 5 कसोटी सामन्यांची मालिका आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीकोनातून टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची आहे.  त्यामुळे, येथील सामन्यात विराटची बॅट तळपावी आणि किंग कोहलीने शतक झळकावे अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.   


हेही वाचा


अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव