गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अहेरी एसटी आगाराच्या बस वाहकाचे शुल्लक कारणावरुन एका दुचाकी चालकाने डोके फोडून जखमी केल्याची घटना घडली आहे. मुलेचरा तालुक्यातील सुंदरनगर जवळ ही घटना घडली आहे. शुल्लक कारणातून दुचाकीस्वराने बस रस्त्यात अडवून बसचालकाला मारहाण केली आहे. त्यामुळे जवळपास एक तास प्रवासी ताटकळत होते.
मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वराला अटक
अहेरी आगाराची बस क्रमांक एम एच 14 एल एक्स 5177 ही गडचिरोली वरुण मुलचेरा मार्गे अहेरीकडे येत होती. अरुंद रस्त्यामुळं बस वाहकाने दुचाकीस्वार व्यंकटेश गाजर्लावार रा. कोपरअली यांना दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी दुचाकीस्वाराने वाहकास शिवीगाळ केली आणि बाचाबाची वरुन वाहक सुहास हंबर्डे यांना मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळं वाहकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. वाहक सुहास हंबर्डे यांनी अहेरी एस टी आगार आणि पोलिस स्टेशन मुलचेरा यांना भ्रमणध्वनीने यांना माहिती दिली. काही वेळातच मुलचेरा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वाहक सुहास हंबर्डे यांना मुलचेरा रुग्णालयात दाखल केले आहे. तर मारहाण करणाऱ्या व्यंकटेश गाजर्लावार यास अटक करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या: