UGC NET Admit Card 2021: यूजीसी नेट परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी करण्यात आलं आहे. ही परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. परीक्षा फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना आपलं प्रवेशपत्र ugcnet.nta.nic वरुन मिळणार आहे. विना अॅडमिट कार्ड कोणत्याही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही.
UGC NET Admit Card 2021 डाऊनलोड करण्याची पद्धत
स्टेप 1: सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic वर जा.
स्टेप 2: तिथं दिसत असलेल्या अॅडमिट कार्ड या लिंकवर क्लिक करा
स्टेप 3: तिथं मागितलेली आवश्यक माहिती भरुन एंटर करा
स्टेप 4- होम पेजवर आपलं प्रवेशपत्र अर्थात अॅडमिट कार्ड दिसेल.
स्टेप 5- हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि प्रिंट आऊट काढायला विसरु नका.
ही परीक्षा आधी 17 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित केली जाणार होती. मात्र अन्य परीक्षाही याच काळात असल्यानं यूजीसीनं परीक्षा पुढं ढकलल्या होत्या. .
यूजीसी नेट परीक्षा दोन टप्प्यात होणार
नेशनल टेस्टिंग एजंसीकडून नवीन परिपत्रकानुसार नेट परीक्षा दोन टप्प्यात आयोजित केली आहे. याचा पहिला टप्पा 20 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान असेल तर दुसरा टप्पा 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर, 2021 दरम्यान आयोजित केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यातील परीक्षेच्या तारखा 20, 21, 22, 24, 25, 26, 29 आणि 30 नोव्हेंबर, 2021
दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांच्या तारखा – 01, 03, 04 आणि 05 डिसेंबर 2021
यूजीसी नेट म्हणजे काय?
यूजीसी नेट ही राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षा आहे. मात्र, याची दोन उद्दीष्टे आहेत. पहिलं म्हणजे विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश घेण्यास मदत होते. दुसरं विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी त्याची पात्रता आवश्यक आहे. नेट शिवाय प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही. विशेष म्हणजे एनटीए या परीक्षेचं आयोजन करते. यापूर्वी ही परीक्षा यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) घेत होते.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI