गडचिरोली : गडचिरोलीत सिरोंचा-आलापल्ली मार्गावरील भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा  जागीच मृत्यू झाला आहे, तर 8 जण जखमी झाले आहे. उमानूर गावाजवळ हा अपघात झाला आहे.


लग्नकार्याहून घरी परतत असताना पहाटे 3 वाजता ट्रक आणि मॅक्समध्ये जोरदार धडक झाली. गाडीत एकूण 14 जण होते त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला.

या अपघातातील सर्व मृत देचलीपेठा गावाचे रहिवासी आहेत. लग्नकार्य आटपून परतत असताना देचलीपेठा उमानूर गावाजवळ हा अपघात झाला आहे.