मुंबई: पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोल 19 पैशांनी तर डिझेल 21 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 86.91 रुपयांवर पोहोचलं आहे, तर डिझेल 75.96 रुपये झालं आहे. मुंबईतील पेट्रोल दराचा हा उच्चांक आहे.

दुसरीकडे राज्यात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत आहे. इथे प्रति लिटर पेट्रोलसाठी तब्बल 88.17 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे पेट्रोलची वेगाने शतकाकडे वाटचाल सुरु असून, पेट्रोल शतकापासून अवघे 12 रुपये दूर आहे.

महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांच्या यादीत सोलापूर आणि औरंगाबाद  दुसऱ्या क्रमांकावर आहेत. इथे पेट्रोलचा आजचा दर  87.96 रुपये लिटर इतका आहे.

महाराष्ट्रात अमरावतीत सर्वात महाग पेट्रोल

महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत मिळत आहे. अमरावतीतील आजचा पेट्रोल दर हा 88.17 रुपये प्रति लिटर इतका आहे. काल हा दर 87.97 रुपये इतका होता. त्यामध्ये आज 19 पैशांनी वाढ झाली.

महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर

मुंबई – 86.91

पुणे 86.71

ठाणे – 86.99

नाशिक 87.30

औरंगाबाद – 87.96

नागपूर – 87.39

कोल्हापूर 87.10

सोलापूर – 87.96

अमरावती – 88.17  

सिंधुदुर्ग – 87.83

अहमदनगर – 86.76

आंतरराष्ट्रीय बाजाराचा फटका

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीतील चढ-उतारामुळे, भारतातील इंधनाचे दर वाढत आहेत, असं पेट्रोल डिलर फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे उदय लोध यांनी सांगितलं.

शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचं अवमूल्यन होत असल्याने त्याचा थेट परिमाणही पेट्रोल-डिझेलच्या दरावर होत असल्याचं लोध म्हणाले. सरकारने एक्साईज ड्युटी आणि अन्य करात कपात करणं गरजेचं आहे, तरच इंधनाचे दर आटोक्यात येतील, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या 

पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरुच, अमरावती, सोलापुरात महाग पेट्रोल  

इंधन दरवाढीचा फटका, भाजीपाला दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ  

स्पेशल रिपोर्ट @830 | पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला, 'अच्छे दिन'चं स्वप्न हवेतच  

डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, पेट्रोलही महागलं