Nagpur : 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानांतर्गत शहरातील विविध भागातील एकूण सुमारे 2 लाख 63 हजार 410 हजार महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे नवरात्री ते दीपावली दरम्यान 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे विशेष अभियान राबविण्यात आले होते. यात 18 वर्षावरील महिलांच्या तपासणीची नागपूर महानगरपालिकेद्वारे व्यापक प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली.


'या' वयोगटातील महिलांची तपासणी


नागपूर महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून 18 वर्ष वयोगटातील 2 लाख 63 हजार 410 महिलांची तपासणी, 2 लाख 21 हजार 503 महिला लाभार्थ्यांची रक्तदाब तपासणी करण्यात आली आहे. 1046 महिला लाभार्थ्यांचे छातीचे एक्स-रे काढण्यात आले. 731 महिलांची दंत तपासणी करण्यात आली. असंसर्गजन्य आजाराची 35 वर्ष वयोगटातील 1 लाख 42 हजार 851 स्त्रियांची तपासणी, 2270 गर्भवर्तीचे टीडी लसीकरण, 322 महिलांची सोनोग्राफी तपासणी करण्यात आली असल्याची माहिती मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी दिली. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतील 10 झोन अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत विविध ठिकाणी महिला आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व तपासणी शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 


34 केंद्रांवर निःशुल्क तपासणी


राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील 18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण आरोग्य मनपाच्या दहाही झोनमध्ये एकूण 34 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमध्ये स्त्रियांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली, शिवाय कॅन्सर स्क्रिनींग करुन त्यांचे समुपदेशन सुद्धा करण्यात आले. शिबिरात महिला व मातांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. 


महिलांच्या 'या' तपासण्या उपलब्ध


त्यांचे वजन आणि उंची घेऊन बीएमआय काढणे (सर्व स्तरावर) हिमोग्लोबिन, युरिन एक्झामिनेशन, ब्लड शुगर, (सर्व स्तरावर ग्रामपातळीपासून), प्रत्येक स्तरावर एचएलएल मार्फत व संस्था स्तरावर उपलब्ध सर्व रक्त तपासण्या युरिन एक्झामिनेशन, ब्लड शुगर (आवश्यकतेनुसार व महिलांच्या वयोगटानुसार) केल्या जात आहेत. याशिवाय चेस्ट एक्स रे, कर्करोग स्क्रिनिंग, रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग (30 वर्षावरील सर्व महिला), आरटीआय-एसटीआयची तपासणी, माता व बालकांचे लसीकरण करण्यात आले. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांच्या नेतृत्वातील आरोग्य चमूने अभियानाच्या यशस्वीतेसाठी महत्वाचे योगदान दिले.


महत्त्वाची बातमी


NMC Recruitment : फडणवीसांनीच मंजूरी दिलेला आकृतिबंध धूळखात; नागपूर मनपातील 17 हजार पदं मंजूर मात्र भरती रखडली