मुंबई : ऑनलाईन गेम म्हणजे सध्या टाईमपास करण्याचा विषय राहिला नसून ते एक व्यसन झाल्याचं दिसतंय. ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात अनेकांनी आपला जीवही गमावला आहे, अनेक जणांच्या आयुष्याची वाट लागल्याचं समोर आलंय. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुलढाण्यातील सातवीत शिकणारी एक 12 वर्षाची मुलगी फ्री फायर (Free Fire Online Game) या ऑनलाईन गेमच्या व्यसनी गेली आणि तिने चक्क घर सोडलं. हा गेम खेळताना ती जामताराच्या (Jamtara) ठगांच्या हाती लागली आणि थेट झारखंडला जाऊन पोहोचली. सध्या या मुलीची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या ठिकाणच्या एका सातवीत शिकणाऱ्या 12 वर्षाच्या मुलीला फ्री फायर या ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन लागलं. हा गेम खेळताना तिची ओळख काही अनोळख्या मुलांशी झाली. त्या मुलांनी या सातवीत शिकणाऱ्या मुलीला फितवलं आणि चक्क घर सोडायला भाग पाडलं. त्या मुलीनेही या अनोळखी मित्रांच्या सांगण्यावरून घर सोडलं. ही बाब लक्षात येताच त्या मुलीच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
जामताराच्या ठगांच्या हाती
झारखंडमधील लालू प्रसाद वर्मा (वय 22) आणइ विकास तुरी (वय 23) हे दोन युवक महाराष्ट्रात आले. गेल्या चार महिन्यांपासून ते या फ्री फायर ऑनलाईन गेम खेळणाऱ्या या अल्पवयीन मुलीच्या संपर्कात होते. ते सातत्याने तिच्याशी चॅटवर बोलत होते. या दोघांनी तिला फितवलं आणि तिला पळवून थेट झारखंडमधील गिरीडिग या ठिकाणी एका नातेवाईकाकडे घेऊन गेले.
या घटनेची झारखंडमधील अहिल्यापूर पोलिसांना कोणीतरी गुप्त माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी गिरीडिह या ठिकाणी झापा मारला आणि या दोन ठगांना अटक केली. पोलिसांनी या अल्पवयीन मुलीची सुटका केली.
झारखंड पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर बुलढाणा पोलीस त्या ठिकाणी गेले आणि त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं. या आरोपीना ट्रान्जिड रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आलं.
फ्री फायर या ऑनलाइन गेमच्या नादात एका मुलगी घर सोडून निघुन गेल्याची घटना मलकापूरात घडली. नेहमी ऑनलाइन गेम खेळत असताना अनेक अनोळखी मित्रांशी तिची ओळख झाली. अशातच झारखंड मधील दोन तरुणांनी तिला धमकाऊन जामतारा येथे घेऊन गेले. याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी या मुलीला शोधुन तिची सुखरुप सुटका केलीय.
मलकापूर शहरातील एक सातवीत शिकणारी 12 वर्षीय मुलगी फ्री फायर या ऑनलाइन गेमच्या नादात घरून निघून गेली ती सापडली साधारण 1580 किलोमीटर दूर असलेल्या झारखंड मध्ये....ती नेहमी ऑनलाइन गेम खेळत असताना अनेक अनोळखी मित्रांशी तिची ओळख झाली. अशातच झारखंड मधील जामतारा येथील दोघे जणांनी तिचा मोबाईल हॅक करून तिला धमक्या देऊन थेट मलकापूर येथे येऊन तिला मलकापूरहुन भुसावळ ते जामतारा येथे घेऊन गेले. मुलगी पोलिसांच्या हाती लागली आणि तिची सुटका झाली.
संबंधित बातम्या :