मुंबई : निलंबीत पोलीस अधिकारी  सचिन वाझे (Sachin Vaze) हा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांना 'नंबर 1' म्हणायचा तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा 'राजा' असा उल्लेख करायचा, अशी माहिती सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयात दिलीय. सीबीआयनं हा खुलासा अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे यांच्या जामीन अर्जाला दाखल केलेल्या उत्तरातून केला आहे.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दरमहा शंभर कोटी रूपयांच्या वसुलीच्या केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी  सीबीआयनं बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेसह संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांनाही अटक केली आहे. सचिन वाझे या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनलेला आहे. पालांडे आणि शिंदे यांची सीबीआयनं 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी आर्थर रोड कारागृहात जाऊन चौकशी केली होती. त्यांनतर त्यांना अटक दाखवण्यात आली.


संजीव पालांडे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर बुधवारी सीबीआयकडून उत्तर दाखल करण्यात आलं. सीबीआयनं दाखल केलेल्या उत्तरात सचिन वाझेंनी दिलेल्या माहितीनुसार तो अनिल देशमुख यांना 'नंबर 1' तर परमबीर यांचा 'राजा' असा उल्लेख करायचा. तसेच सचिन वाझे हा मुंबईतील बार मालकाकडून 'नंबर 1' च्या नावाखाली पैसे वसूल करत होता असंही त्यानं आपल्या जबाबात सांगितल्याचं सीबीआयनं आपल्या उत्तरात म्हटलं आहे.  


सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, वाझे अनिल देखमुख यांना 'नंबर 1' तर परमबीर सिंग यांना 'राजा' संबोधायचा. त्यामध्ये सीबीआयने अनेक गोप्यस्फोट केले आहेत. वाझे मुंबईतील बार मालकांकडून 'नंबर 1'च्या नावाखाली पैसे वसूल करत होता, असा जबाब त्याने दिल्याचे सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 


दरम्यान, या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. परमबीर सिंग यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सचिन वाझे यांच्या मार्फत अनिल देशमुख हे मुंबईमधून शंबर कोटी रुपयांची वसुली करत होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. 


महत्वाच्या बातम्या


Nagpur : राष्ट्रवादीने अनिल देशमुखांचा राजकीय वारसदार निवडला? सलील देशमुखांची काटोल मतदारसंघात सक्रियता 


Arthur Road Jail मध्ये नवे 9 व्हीव्हीआयपी बॅरेक, पुढचा नंबर कोणाचा?