Uday Samant on Foxconn : वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्पातून जेवढ्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्याच्या दुप्पट नोकऱ्या पुढच्या काळात महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी मी घेतो असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिले. पुढच्या वर्षी याचवेळी नोकरी लागल्याचा डेटा महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवेल असे देखील सामंत यावेळी म्हणाले. माझा विश्वास कामावर आहे. मी त्यानुसार वागत असल्याचे त्यांनी सांगितलं. उदय सामंत हे आज (15 सप्टेंबर)  एबीपी माझाच्या (ABP Majha) 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या विरोधक करत असललेले दावे फेटाळून लावले. तसेच फॉक्सकॉन प्रकल्पाच्या संदर्भात माहिती देखील दिली.


अजित पवार बोलले नाहीत तर ते पण शिंदे गटात सामील झाल्याचा समज होईल
 
एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर बोलताना उदय सामंतानी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पापेत्रा दुप्पट नोकऱ्या महाराष्ट्रात देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच याचा डेटा पुढच्या वर्षी देणार असल्याचंही त्यांनी सांतितले आहे. तसेच राज्यात नवीन उद्योग आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे. राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मला जे जे करणं शक्य आहे ते ते मी करणार असल्याची माहिती यावेळी सामंतांनी दिली. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार टीका करत असल्याच्या मुद्यावर देखील सामंत बोलले. अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. ते जर बोलले नाहीत तर असा समज होईल की ते पण शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र, मी स्वत: अजित पवार यांनी भेटणार असल्याचे सामंत यावेळी म्हणाले. मी पंचायत समितीच्या सदस्यांनी बोलावले तरी भेटायला जाईल. आदित्य ठाकरे यांनी बोलावले तरी मी चर्चा करायला जाईल असेही सामंत यांनी यावेळी  सांगितले. 


पुढच्या काळात महाराष्ट्रात संलग्न प्रकल्प आणू


वेदांता-फॉक्सकॉनचा  प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यावरुन राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राजकीय दबावापोटी प्रकल्प गुजरातला गेला असल्याची टीका अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. आमच्या सरकार असताना हे मोठे प्रकल्प राज्यात येणार होते. अनेक उद्योग येणार होते. वेदांताच्या वरिष्ठ टीमने सुद्धा तळेगाव हीच योग्य जागा सांगितलं होत. त्याच वेळी त्या कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये पाहणी केली होती. नंतर 100 गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र अंतिम केलं होतं.  ही गुंतवणूक राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे. या टिकेला सामंत यांनी आज उत्तर दिलं. पुढच्या काळात महाराष्ट्रात संलग्न प्रकल्प आणू अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे सामंत यावेळी म्हणाले. येत्या काही दिवसात चांगला प्रकल्प महाराष्ट्राला मिळेल, असेही उदय सामंत यावेळी म्हणाले. दरम्यान, ड्रग्ज पार्कचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहे. तसेच नागपूरमध्ये टाटा एअरबस प्रकल्प होणार असल्याची माहिती देखील सामंत यांनी यावेळी दिली. 


महत्त्वाच्या बातम्या: