Raigad Congress News : रायगड (Raigad) जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस प्रवीण ठाकूर (Pravin Thakur) हे काँग्रेसला रामराम करत उद्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. माझ्या वडिलांवर अन्याय झाला. काँग्रेस पक्षातून जनतेचे प्रश्न सुटत नसल्याने राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत प्रवीण ठाकूर यांनी खदखद व्यक्त केली.
काँग्रेसकडून जनतेचे प्रश्न सोडवले नसल्यामुळं या पक्षात राहून काय उपयोग
माझ्या वडिलांनी 38 वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर त्यांना आमदारकीची उमेदवारी मिळाली खरी, पण माझ्या वडिलांवर एकप्रकारचा अन्याय झाला आहे. रायगड जिल्ह्यात काँग्रेसने कोणतेही जनतेचे प्रश्न सोडवले नसल्यामुळं या पक्षात राहून काय उपयोग, त्यामुळे मी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतोय अशी खदखद काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रवीण ठाकूर यांनी व्यक्त केलीय. प्रवीण ठाकूर हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आहेत उद्या ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात उरल्या सुरल्या काँग्रेसला धक्का बसणार आहे.
कालच काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला होता भाजप प्रवेश
काँग्रेस पक्षाला सातत्यानं धक्के बसत आहेत. कालच काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे इतर नेतेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधून भाजपमध्ये जायचं चालू होतं पण मुहूर्त मिळत नव्हता. पण आज चांगला मुहूर्त मिळाला असं गोरंट्याल यांनी म्हटलं आहे. पक्षप्रवेश करताना कैलास गोरंट्याल म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधून भाजपमध्ये जायचं चालू होतं पण मुहूर्त मिळत नव्हता. पण आज चांगला मुहूर्त मिळाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. आमचे मित्र संजय केनेकर किती दिवसांपासून माझ्या लागले होते की पक्षप्रवेश करा. त्यामुळे आज मी भाजपात प्रवेश करत आहे. मी तुम्हाला शब्द देतो की जालन्यात भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार. जी उरलेली काही वर्ष आहेत त्यात मी भाजपची सेवा करेन.
महत्वाच्या बातम्या: