Mahadev Munde murder case :  पुढील आठ दिवसात महादेव मुंडे खून प्रकरणातील (Mahadev Munde murder case) आरोपी अटक करा नाहीतर बीड (Beed) जिल्ह्यात कडकडीत बंद करण्यात येणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil)  यांनी दिला आहे. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात मुंडे कुटुंबाला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज  व्यापक बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महादेव मुंडे यांचे कुटुंब, सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. 

Continues below advertisement

मुंडे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहणार, बैठकीत निर्णय

या बैठकीतून मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) थेट धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. आमचे वैर मुंडे बहीण भावाशी नाही. पुढील आठ दिवसात मुंडे हत्या प्रकरणात आरोपी अटक झाले नाही. तर बीड (Beed) जिल्हा कडकडीत बंद राहील असा निर्णय घेण्यात आला. जरांगे पाटील यांचे भाषण सुरू असताना मुंडे कुटुंब हुंदके देत रडू लागले. मुंडे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू राहील असा निर्धार या बैठकीतून करण्यात आला. 29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले. मराठा आरक्षणाचा लढा संपल्यानंतर मुस्लिम समाजासाठी लढणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला, 20 महिन्यानंतरही आरोपींना अटक नाही

21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला होता. 22 ऑक्टोबर रोजी 12:15 ते 1:30 असे सव्वा तास परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन चालले. पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा त्यात अंगावर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यांच्या अंगावर रक्ताने माखलेली पांढरी बनियान, ब्राऊन कलरचा शर्ट होता. लाल करदोडा आणि पाकीट होते. चेहरा, छाती आणि हात रक्ताने माखलेले होते. सव्वा तास हे पीएम चालले होते. या घटनेला तब्बल 20 महिने लोटले त्यानंतरही यातील आरोपी निष्पन्न नाहीत. त्यामुळेच महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न करत आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

Mahadev Munde Case: महादेव मुंडेंचा गळा चिरला; चेहरा, मान अन् हातावर 16 वार; पोस्टमार्टम रिपोर्टमधून गुन्हेगारांचं क्रौर्य समोर आलं