Parabhani Latest News : कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पाच जणींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना परभणीमध्ये घडली. तलावावर कपडे धुताना मुलीचा पाय घसरला.. ती बुडायला लागली म्हणून तिला वाचवण्यासाठी आलेल्या इतर चार जणींचाही बुडून मृत्यू झालाय. परभणीच्या पालम तालुक्यातील बनवसच्या तुळशीराम तांडा येथे ही दुर्देवी घटवा घडली आहे.  


तलावावर कपडे धुवताना अचानकपणे बुडत असलेल्या एका मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात अन्य चार जणींसह एकूण पाच जणी बुडाल्याची घटना समोर आली आहे.  शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या आसपास ही दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेनंतर बनवसच्या तुळशीराम तांडा परिसरावर शोककळा पसरली आहे. 


परभणीच्या पालम तालुक्यातील बनवस परिसरातील रामापूर तांडा व पिराचा तांडा येथील बालाघाट सिद्धी शुगर सहकारी साखर कारखाना येथे ऊस तोडणीच्या कामासाठी गेलेले मजूर महिला राधाबाई धोंडीबा आडे व त्यांच्या मुली दीक्षा धोंडिबा आडे, काजल धोंडिबा आडे व पिराचा तांडा येथील सुषमा संजय राठोड व अरुणा गंगाधर राठोड या पाच जणी तुळशीराम तांडा येथील पाझर तलावांमध्ये धुणं धुण्यासाठी गेल्या होत्या. धुणे धुत असतानाच एकीचा पाय घसरला.. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य चार जणींचाही तलावात बुडून मृत्यू झालाय. तलावात बुडणाऱ्या मुलगी आणि वाचवण्यासाठी गेलेल्या चार जणी, असे एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. 


पाच जणी बुडत असल्याचे जवळच खेळत असलेल्या एका 10 वर्षीय मुलाने पाहिले...त्यानंतर त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जवळच असणाऱ्या गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली... त्या पाचही जणींना तलावातून बाहेर काढले.. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.. त्या पाचही जणींचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ पोहचले.. त्यांनी गावकऱ्यांशी याबाबत माहिती घेत.. आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 


हे देखील वाचा-